शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘गुरुजनांचे सामूहिक विडंबन थांबवा’, राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:44 IST

शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे़ परंतु अलीकडे शिक्षकांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे विडंबन सुरु आहे़ महिला शिक्षिकांनादेखील कमकुवत दाखवणारे संदेश फिरतात. गुरुजनांच्या प्रती होणारे हे सामूहिक विडंबन तातडीने थांबवा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले़

सोलापूर : शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे़ परंतु अलीकडे शिक्षकांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे विडंबन सुरु आहे़ महिला शिक्षिकांनादेखील कमकुवत दाखवणारे संदेश फिरतात. गुरुजनांच्या प्रती होणारे हे सामूहिक विडंबन तातडीने थांबवा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले़राज्य शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सकाळी सोलापूरमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला़ याप्रसंगी ते बोलत होते. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ़ भारत भालके, शिक्षण सचिव नंदकुमार, माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, आदी उपस्थित होते.यावेळी ३७ प्राथमिक तसेच ३९ माध्यमिक तसेच आदिवासी भागातील १८, कला-क्रीडा क्षेत्रात काम करणारे दोन, स्काऊट गाईडचे दोन शिक्षक आणि अपंग आणि सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त आठ शिक्षिकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले़प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना खेळाप्रमाणे स्वच्छतेसाठी अर्धातास समाविष्ठ करावा, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.राज्यातील ६५ हजार पैकी ६० हजार शाळांना सर्वसामान्य जनता आणि कंपन्यांनी सीएसआरमधून एकूण ३२८ कोटींची मदत दिल्याची माहिती शिक्षण सचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकात दिली. शिक्षक परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.