शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

‘एकरूख’मध्ये पाणी आणण्यासाठी फोडला जातोय पाषाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:19 IST

निरूपणकारांनी घेतले मनावर; लोकवर्गणीतून उपक्रम; मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केल्याने कामाला आला वेग

ठळक मुद्देलोकवर्गणीतून आतापर्यंत २५ लाख रुपये जमले असले तरी आणखीन पैशाची गरजएकरुख तलावात पाणी आले तर आसपासच्या गावांची व सोलापूर शहराची तहान भागेल

अरुण बारसकर 

सोलापूर: पाऊस नसल्याने पाणी मिळणे ही आज नवलाई वाटू लागली आहे. ही अवस्था असल्याने नरोटेवाडीकरांनी निरूपणासाठी आलेल्या निरूपणकार वामन शिंदे यांना शेजारून वाहणाºया कालव्याचे पाणी दाखविले. निरूपणकारांनी मनावर घेतले अन् पाणी आणण्यासाठी पाषाण फोडण्याच्या कामाला सुरुवात झाली. लोकवर्गणी देण्यासाठीही हात पुढे आल्याने सहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात तर पाण्याची स्थिती अतिशय खराब आहे. सोलापूर शहरासाठी एकरुख तलावात पाणी आणण्याचे महानगरपालिकेने केलेले प्रयत्नही थांबले आहेत. उत्तर तालुक्यातील गावोगावी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निरूपण दिले जाते. निरूपणासाठी वामन शिंदे नरोटेवाडीला आले होते. तेथील महिला व पुरुषांनी शिरापूर उपसा सिंचनचे पाणी पारवे तलावात आणता येईल; मात्र खोदाई करावी लागेल, असे सांगितले. 

वामन शिंदे हे गावकºयांसोबत कॅनॉलवर गेले. तेथून पारव्याचा तलावही पाहिला अन् गावात येऊन शशी शिंदे, बाळासाहेब पौळ, दाजी जाधव यांना सांगितले. त्यांनी माळरान तुडवत परिसर पाहिला. खोदाई केली तर पाणी येईल मात्र पैसे मिळणार कसे?, हा प्रश्न समोर असल्याने या कार्यकर्त्यांनी काही राजकीय नेते, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना ही कल्पना दिली. त्यांनी होकार देताच प्रत्यक्षात बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी कामाला सुरुवात झाली. मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केल्याने शिरापूर उपसा सिंचनचा कालवा ते पारवे तलावापर्यंतच्या खोदाईचे काम सुरू आहे. 

साधारणत: या ८०० मीटरच्या अंतरात  संपूर्ण पाषाणच आहे. पाण्यासाठी पाषाण फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. विष्णू जगताप, प्रवीण लबडे, रामू पौळ, शिवाजी जाधव, भाऊ शिंदे, किरण जाधव, अंगद चव्हाण, अरुण शिंदे, उमेश भगत, बजरंग देवकर, दगडू उंबरे, कुमार शिंदे, शिवाजी पाटील, शरद काटे, बापू शिंदे आदी रात्रंदिवस लोकवर्गणीतून काम करून घेत आहेत.

२७ फुटांपर्यंत होतेय खोदाई

  • - कॅनॉल ते पारवे तलाव हे अंतर ८०० मीटर असून, १० ते २७ फुटांपर्यंत खोदाई करावी लागत आहे. 
  • - अभियंता जवाहर उपासे यांनी सर्व्हे केला असून, त्यांच्या मते खोदाईचे काम झाले तर पारवे तलावात पाणी येऊ शकते.
  • - बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, महेश थोबडे, सिद्धेश्वर कंट्रक्शनचे सिद्धेश्वर काळे, यश कंट्रक्शनचे प्रल्हाद काशीद यांनी मोठी मदत केली असून उळे, हगलूर, हिप्परगा, एकरुख-तरटगावचे ग्रामस्थ लोकवर्गणी देत आहेत.
  • - शशी शिंदे यांच्या आर्या व सत्यशील या मुलांनी गल्ला फोडून २४ हजार रुपये दिले. 
  • - नरोटेवाडीचे दगडू उंबरे व ग्रामस्थ रात्रंदिवस कामावर बसून असून कामगारांना चहा, नाष्टा, जेवणाची सोय नरोटेवाडीकर करीत आहेत. 

पाणी येणार किती?शिरापूर उपसा सिंचनाचे पाणी नान्नज येथील कॅनॉलमधून पारवे तलावात आल्यानंतर उताराने नाल्याद्वारे नरोटेवाडी, सेवालालनगरच्या ओढ्यात येणार आहे. तेथून होनसळच्या ओढ्यातून पुढे एकरुख तलावात येणार आहे. ८०० मीटरचा पाषाण फोडून पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला तर शिरापूर उपसा सिंचन योजना किती दिवस सुरू राहणार व एकरुख (हिप्परगा) तलावात पाणी किती येणार हे उजनी कालवा मंडळाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

बालाजी अमाईन्स व अभियंता जवाहर उपासे यांनी सर्व्हे करून पाणी येईल असे सांगितले आहे. खोदाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल. लोकवर्गणीतून आतापर्यंत २५ लाख रुपये जमले असले तरी आणखीन पैशाची गरज आहे. एकरुख तलावात पाणी आले तर आसपासच्या गावांची व सोलापूर शहराची तहान भागेल.- शशी शिंदे

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूक