शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

तरीही...नाटक मरणार नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:18 IST

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांची मुलाखत 

ठळक मुद्देतंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव - जयंत पवारनाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे - जयंत पवारनवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू - जयंत पवार

सोलापूर : हल्लीच्या काळात प्रेक्षकांचा कल दृक माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे नाटक मागे पडत चालले आहे. नवभांडवलदारांचीही नाटक मरावे हीच इच्छा आहे; मात्र असे असले तरी नाटक वैश्विक नसून स्थानिक असल्याने ते कदापिही मरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी केले.

प्रयोग मालाड मुंबई आणि अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरच्या वतीने पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेसाठी आले असता नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. कोल्हापुरातील नाट्यसमीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि रजनीश जोशी यांनी ही प्रगट मुलाखत घेतली. ते म्हणाले, नाटक मागे पडत आहे. तंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव आहे. नाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे. नवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र नाटकातील विषय स्थानिक असल्याने ते प्रेक्षकांना आपले वाटतात. नाटकासाठी बरेच वेगळेपण लागते. प्रेक्षकांतही एकाग्रता  हवी असते. अलीकडच्या शॉर्ट फिल्मच्या जमान्यात नाटक मागे पडल्याची खंत असली तरी ते मरणार मात्र नाही. 

करुणेकडे कोणत्या नजरेने पाहता या प्रश्नावर ते म्हणाले, लेखकाला डोळे ताठ ठेवावे लागतात. करुणा आणि शोषणाकडे                           मी अनुकंपेने बघत नाही. लेखकाने निर्दयी व्हावे. त्या निर्दयतेतून वास्तव टिपावे, तरच  वाचकांच्या मनात करुणा निर्माण होईल. लेखकच रडायला लागला तर शोषण दिसणार नाही. वास्तवता दाखविणे हेच साहित्याचे काम आहे. ते आपण केले.

‘त्यांचे’ साहित्य माझ्या रक्तात डीएनएसारखे- भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य आपण एवढे जिरवले की ते आपल्या रक्तात डीएनएसारखे उतरले आहे. या सर्व लेखकांच्या मर्यादा आणि उंची मला माहीत आहे. वाचकांना लेखकांच्या मर्यादा कळाव्या लागतात. आपण नाटकाकडून कथालेखनाकडे वळलो. प्रत्यक्षात कथेतही नाटक असते आणि नाटकातही कथा असते. खरे तर साहित्यातील या सीमारेषा आता धुसर व्हायला हव्या. ‘काय डेंजर वारा सुटलायं’ मध्ये मी जागतिकीकरणाचा धोका मांडला. नाटक हे समूहाने करायचे असते तर कथालेखन वाचकांशी बांधिल असते. नाट्य रंगमंचाच्या अवकाशात असते. ते ताण निर्माण करते. त्यातून कलावंतांचे कसब पणाला लागते.

टॅग्स :Solapurसोलापूर