शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील खड्ड्यांचे फोटो अ‍ॅपवर पाठवताच अत्याधुनिक यंत्रानं रस्ता होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 14:57 IST

राकेश कदम  सोलापूर : शहरातील रस्त्यांवर नेमके कुठे व किती खड्डे आहेत, याची तंत्रशुद्ध माहिती मिळावी. हे  खड्डे दुरुस्तीचे ...

ठळक मुद्देबंगळुरु येथील जनाग्रह सामाजिक संस्था आणि सोलापूर महापालिकेच्या वतीने एक मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येत आहेमहापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकताच यासंदर्भात जनाग्रहसोबत करार     केला

राकेश कदम 

सोलापूर : शहरातील रस्त्यांवर नेमके कुठे व किती खड्डे आहेत, याची तंत्रशुद्ध माहिती मिळावी. हे  खड्डे दुरुस्तीचे काम झाले की यावर महापालिका आयुक्तांचे लक्ष असावे, यासाठी बंगळुरु येथील जनाग्रह सामाजिक संस्था आणि सोलापूर महापालिकेच्या वतीने एक मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकताच यासंदर्भात जनाग्रहसोबत करार     केला आहे. हे काम सुरू असताना दुसरीकडे महापालिकेने खड्ड्यांची दुरुस्ती तंत्रशुद्धपणे व्हावी, यासाठी अत्याधुनिक मशीन खरेदीची निविदा काढली आहे. 

शहरातील मुख्य रस्ते आता चांगले असले तरी छोट्या रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या तोंड वर काढते. नगरसेवक आणि सामान्य नागरिक महापालिका आणि  विभागीय कार्यालयात हेलपाटे मारतात. अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले की त्यावरुन राजकारणही होते. अनेकदा या खड्ड्यांची माहिती वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत पोहोचत  नाही.

अशा विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यासाठी बंगळुरु येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटीझनशिप अँड डेमोक्रसी या बिगर सरकारी संस्थेशी करार केला आहे.

या संस्थेने स्वच्छ भारत मिशनसाठी अ‍ॅप तयार केले असून, त्याचा वापर देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे. खड्ड्यांबाबतच्या अ‍ॅपमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, यासंदर्भात जनाग्रह संस्थेतील अभियंत्यांशी चर्चा झाली आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो मोबाईल अ‍ॅपवर काढतील. अ‍ॅपमधून खड्ड्याचे तंत्रशुद्धपणे सर्वेक्षण होईल. हे फोटो एका स्क्रीनवरही पाहता येतील. त्याची माहिती संबंधित बांधकाम विभागाला दिली जाईल. सध्या अनेक मुद्यांवर काम सुरू आहे. लवकरच हे अ‍ॅप तयार होईल, असा दावाही डॉ. ढाकणे यांनी केला. 

पावसाळ्यातही करता येईल काम अशी मशीन घेणार 

  • - महापालिकेकडे खड्डे बुजविण्यासाठी मशीन आहेत. पण त्यांचे आयुष्यमान संपले आहे. खड्डे तंत्रशुद्ध पद्धतीने बुजविता यावेत, महापालिकेने एक मशीन खरेदी करण्याची निविदा काढली आहे. ही निविदा दोन कंपन्यांनी भरली आहे.
  • - या मशीनमध्ये स्वयंचलित पद्धतीने डांबर आणि खडी यांचे मिश्रण होईल. खड्ड्यांचा आकार निश्चित करून त्यात प्रेशरने धूळ साफ केली जाईल. प्रेशरनेच रस्त्याच्या लेव्हलला खड्डा बुजवून घेतला जाईल.
  • - आजूबाजूला डांबरचा थर जमणार नाही. जुन्या मशीनद्वारे पावसाळ्यात काम करता येत नाही. पण नव्या मशीनद्वारे पावसाळ्यातही काम करता येईल, अशी माहिती महापालिकेचे रस्ते अभियंता युसूफ मुजावर यांनी दिली. 

रस्त्यावरील खड्डे हा विषय आर्थिक आणि सामाजिक पातळीवरही नुकसान करतो. आर्थिक नुकसान हे केवळ त्या व्यक्तीचे नव्हे तर संस्था, शासनाचेही होते. या समस्येचे वेळेवर निराकरण व्हायला हवे. त्याची माहिती वेळेवर महापालिका प्रशासनाला मिळावी, यासाठी मोबाईल अ‍ॅप आणि अत्याधुनिक मशीनरी खरेदी करण्यात आली आहे. जग खूप पुढे चालले आहे. बांधकाम विभागात नव्या तंत्राचा वापर होतोय. तीच पद्धत सोलापूर महापालिकेने स्वीकारावी, असा प्रयत्न आहे. - डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक