सोलापूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या ‘गड्डा’ यात्रेस गुरुवारपासून ६८ लिंगांच्या तैलाभिषेक विधीने प्रारंभ झाला. ‘हर्र बोला... हर्र’चा अखंड गजर आणि सिद्धेश्वरांचा जयघोष करीत सकाळी नंदीध्वजांची शानदार मिरवणूक पारंपरिक थाटात निघाली. ती पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती. बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून सकाळी सव्वानऊ वाजता मानाच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक निघाली. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शुभ्र बाराबंदी, धोतर आणि फेटा घातलेले सेवेकरी सकाळी सात वाजल्यापासून जमू लागले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापौर सुशीलाताई आबुटे यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर हिरेहब्बू वाड्यात आले. (प्रतिनिधी)
सिद्धरामेश्वर यात्रेस प्रारंभ
By admin | Updated: January 13, 2017 03:58 IST