शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रक्षाळ पूजेने नित्योपचारास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:15 IST

आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळ पूजेचा उत्सव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात होतो.

ठळक मुद्दे शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळ पूजेचा उत्सवविठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान विठ्ठलाला पारंपरिक अशा विविध अलंकारांनी सजविण्यात आले

पंढरपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजेनंतर नित्योपचारास प्रारंभ झाला. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान करण्यात आले़ त्यानंतर खास पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळ पूजेचा उत्सव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात होतो़ 

आषाढी यात्रेमध्ये भक्तांना २४ तास दर्शन देऊन थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिणवटा जावा म्हणून परंपरेनुसार विठुरायाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे पंधरा ते सोळा पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला.

आषाढी व कार्तिकी यात्रेच्यावेळी लाखोंच्या संख्येने भक्त येतात. येथे येणाºया प्रत्येक वारकºयांना विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी विठुराया हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूपारती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग देखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन विठ्ठलाला देखील थकवा आलेला असतो. 

विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळ पूजेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो, अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार १ आॅगस्ट रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालून मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील कर्मचाºयांकडून विठ्ठलाला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी देवाला आकर्षक पोशाख परिधान करुन पारंपरिक अशा विविध अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धूपारतीचा कार्यक्रम झाला. 

या अगोदर यात्रेमुळे काढण्यात आलेला विठ्ठलाचा पलंग देखील शयनघरात पूर्ववत लावण्यात आला. प्रक्षाळ पूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले. 

पंधरा पदार्थांपासून बनविण्यात येतो काढा- विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा, यासाठी देवाला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदामबी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात येत असतो. हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवाटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा