शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांगोल्याचा जनावरांचा आठवडा बाजार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST

सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार लंपी स्किन डिसिजन आजारामुळे बंद केला होता. शेतकरी,व्यापारी बांधवांच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक ...

सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार लंपी स्किन डिसिजन आजारामुळे बंद केला होता. शेतकरी,व्यापारी बांधवांच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांना निवेदन देऊन बाजार सुरु करण्याची मागणी केली आहे. मार्चपासून कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले होते. हळूहळू कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.

दरम्यान, सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात मिरज, कराड, पेठ वडगाव, मुरगुड, मोडनिंब, वैराग, बार्शी, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदींसह परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी दर आठवड्याला जनावरांसह खरेदी-विक्रीसाठी दाखल येतात. प्रत्येक बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

गेल्या नऊ महिन्यांपासून हा आठवडा बाजार बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे छोटे-मोठे व्यापारी व शेतकऱ्यांची उपासमार होऊ लागली आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी मध्यंतरी जनावरांचा आठवडा बाजार सुरू केला होता; मात्र स्कीन डिसिजन आजारामुळे बंंद केला आहे. शेतकरी व व्यापारी बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बंद केलेला जनावरांचा आठवडा बाजार तत्काळ सुरू करावा अशी शेतकरी अन्‌ व्यापाऱ्यांची मागणी आहे.

यावेळी रामचंद्र वाघमोडे, बाबुराव सोपे, शिवाजी हजारे, योगेश थोरबोले, सत्यवान गडदे, बापू गावडे, तुषार वाघमोडे, सचिन वाघमोडे, दीपक कांबळे, भिवाजी गावडे, जयवंतराव जगताप, रामचंद्र फडतरे, सतीश सावंत, रावसाहेब शिंदे, प्रकाश सावंत, दिनकर लांडगे, शिवाजी चौगुले, भगवान साळुंखे, सलीम मुंडे, प्रकाश साळुंके, हनुमंत साळुंखे, आबासो गेजगे, विष्णुपंत गेजगे, रमेश गेजगे आदींसह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

------