शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळामुळे सोलापूर मनपा स्थायी समिती सभापती निवड प्रक्रिया ढकलली पुढे, 7 मार्चला होणार निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 10:17 IST

सोलापूर महानगपालिका स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली आहे.

सोलापूर - सोलापूर महानगपालिका स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे.सोलापूर महापालिका स्थायी सभापती निवडीत गुरुवारी भाजपाच्या गटबाजीचा पुन्हा दणका बसला. प्रदेश भाजपातर्फे राजश्री कणके यांचे नाव आलेले असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे सहा सदस्यीय शेवटच्या क्षणापर्यंत न आल्याने भाजपाची उमेदवारी दाखल होण्याची गोची झाली. होती शेवटचा एक मिनिट उरलेला असताना महापौर शोभा बनशेट्टी, संजय कोळी व भाजपाचे इतर पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले पण वेळ संपलेली आहे असे सांगून शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण व इतर पदाधिका-यांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले होते. 

संजय कोळी अजून वेळ आहे असे म्हणत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यास प्रखर आक्षेप नगरसचिवांपर्यंत जाण्यास रोखले़ सुमारे पाच मिनिटे नगरसचिव कार्यालयात शिवसेना-भाजप पदाधिका-यांत हमरीतुमरी झाली. शेवटी नाईलास्तव महापौर शोभा बनशेट्टी, उमेदवार राजश्री कणके, संजय कोळी व इतर कार्यकर्ते बाहेर पडले. वेळ संपली तेव्हा स्थायी सभापती पदासाठी एकमेव उमेदवार गणेश वानकर यांचा एकच अर्ज आला आहे. त्यामुळे भाजपा गटबाजीत स्थायी सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गोंधळानंतर भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी व इतर पदाधिकारी यांची फोनाफोनी सुरू होती़ या गोंधळाबाबत त्यांची काय भूमिका असणार याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.

भाजपामधील गोंधळाचा तिस-याला फायदा  गोंधळानंतर नगरसचिव प्रविण दंतकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला मात्र त्यावर अनुमोदक म्हणून कोणाचीच सही नाही़ त्यामुळे छाननीत या अर्जाचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ, संतोष भोसले व इतर दोन सदस्य दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले होते मात्र त्याचवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज एका कार्यकर्त्यांने पळवून नेला त्यामुळे संतापून ते चौघे नगरसेवक निघून गेले़ भाजपाचे उमेदवार कणके अनुमोदकच्या प्रतिक्षेतच राहिल्या दरम्यान, विरोधी गटाचे सदस्य नगरसचिव कार्यालयात आले पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपामधील गोंधळाचा तिस-याला फायदा झाल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिका