शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:04 IST

सोलापूर,  :-  येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सेतू सभागृहात जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समन्वय अधिकारी प्रवीण साळुंके उपस्थित ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत आढावा बैठकवारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये - डॉ. भोसलेसर्व कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत - डॉ. भोसले

सोलापूर,  :-  येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

 डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सेतू सभागृहात जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समन्वय अधिकारी प्रवीण साळुंके उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांमध्ये संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग यांचा प्रत्येक तालुक्यानुसार आढावा डॉ. भोसले यांनी  घेतला. तसेच सांगली-सोलापूर,  टेंभुर्णी-करमाळा, म्हसवड-पंढरपूर, सोलापूर-अक्कलकोट आदी प्रमुख  रस्त्यांची कामे, सर्वेक्षण, मोजणी  व भूसंपादन प्रक्रिया या बाबींची माहिती डॉ. भोसले यांनी घेतली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर