शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

सभापती ननवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे पराभूत; साडे पुनवर त्रिशंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

तालुका पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्याकडे असलेल्या देवळाली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. बागल गटाचे आशिष गायकवाड यांनी बाजी मारली ...

तालुका पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्याकडे असलेल्या देवळाली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. बागल गटाचे आशिष गायकवाड यांनी बाजी मारली आहे, गायकवाड यांना सात तर ननवरे यांना ६ जागा मिळाल्या. जातेगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या पॅनेलविरोधात स्थानिक पातळीवर शिंदे, पाटील, बागल व जगताप गटाने एकत्रित येऊन निवडणूक लढविल्याने त्यांना एकही जागावर विजय संपादन करता आला नाही. उमरडमध्ये सत्तांतर होऊन आमदार संजयमामा शिंदे गटाचे वामनराव बदे यांचा झेंडा फडकला. सावडीमध्येसुध्दा आमदार संजयमामा शिंदे गटाचे सतीश शेळके, हनुमंत मांढरे यांना निर्विवाद बहुमत मिळाले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सेनेचा फिसरे ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. सेनेला सहा तर बागल गटाला १ जागा मिळाली आहे. साडे ग्रामपंचायतमध्ये आमदार संजयमामा गटाचे दत्ता जाधव यांना सहा तर विरोधी पाटील गटाला सहा जागा मिळाल्या. एका अपक्षाने बाजी मारल्याने अपक्षाला भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुनवरमध्ये पाटील गटाला, बागल, जगताप गटाला प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळाला. कुगावमध्ये धुळाभाऊ कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटाचा झेंडा फडकला शेटफळमध्ये बागल गटात फूट पडल्याने बागल गटाला एकहाती सत्ता गमवावी लागली. कोंढेजमध्ये पाटील गटाने बहुमत मिळविले असून, पाटील गटाला ६ जागा तर शिंदे व जगताप युतीला ३ जागा मिळाल्या. कविटगावमध्ये पाटील गटाने सर्व ९ जागांवर विजय संपादन करीत एकहाती सत्ता मिळविली. हिवरवाडी येथे बागल गटाला चार तर विरोधी गटाला तीन जागा मिळाल्या. श्रीदेवीचामाळमध्ये बागल व पाटील युतीला पाच तर शिंदे व जगताप युतीला चार जागा मिळाल्या. केडगावमध्ये आमदार संजयमामा गटाला घवघवीत यश मिळाले. योगेश बोराडे पॅनेलचे सर्व सात उमेदवार विजयी झाले. पांगरेमध्ये संजयमामा व बागल युतीने नऊ पैकी आठ जागा मिळविल्या. ढोकरीमध्ये बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर व खरात यांनी पाच जागा मिळवून पाटील गटाचा झेंडा फडकवला आहे. सौंदे येथे संजयमामा व बागल गटाला चार तर पाटील गटाला तीन जागा मिळाल्या. घारगाव,मालवंडी, पाथुर्डी, कुंभेज, कोळगाव या ठिकाणी पाटील गटाने निर्विवाद बहुमत मिळविले. नेरले येथे संजयमामा गटाला पाच तर इतरांना चार जागा मिळाल्या. गुळसडीमध्ये संजयमामा गटाने नऊ जागांवर विजय संपादन केला. पोथरेमध्ये बागल व पाटील युतीने नऊ तर संजयमामा व जगताप गटाला अवघ्या दोन जागावर समाधान मानावे लागले.

रश्मी बागल यांच्या घरच्या मांगी ग्रामपंचायतीमध्ये संजयमामा गटाचे सुजित बागल यांनी चुरशीने लढत देत चार जागांवर विजय संपादन केला असून, पाच जागा घेऊन रश्मी बागल यांच्या पॅनेलचे काठावर बहुमत झाले आहे. हिवरवाडी येथे बागल गटाला काठावर सत्ता मिळाली. पण मावळते सरपंच बाळासाहेब पवार यांच्या पत्नीचा अवघ्या पाच मतांनी धक्कादायक पराभव झाला. तर जगताप गटाचे जयराज चिवटे विजयी झाले. बोरगावमध्ये संजयमामा व जगताप गटाचे विनय ननवरे यांना बहुमत मिळाले. आळजापूरमध्ये जगताप-बागल युतीला पाच जागा तर संजयमामा-पाटील युतीला चार जागा मिळाल्या येथे विद्यमान सरपंच युवराज गपाट यांना पराभव पत्करावा लागला­.

शिंदे, पाटील, बागल गटाकडून विजयाचे दावे..

करमाळा तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पाडली त्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाने २०, माजी आमदार नारायण पाटील गटाने २७ तर बागल गटाने १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात विजयी उमेदवारांचा तानाजी झोळ व चंद्रकांत सरडे यांनी तर माजी आमदार पाटील यांच्या जेऊर येथील संपर्क कार्यालयात माजी आमदार नारायण पाटील व बागल यांच्या संपर्क कार्यालयात दिग्विजय बागल यांनी स्वागत करून सत्कार केले.

----

फोटो मेल केले आहेत. फोटो ओळी फोटो खाली दिलेले आहेत.