शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

भाजपच्या एकहाती नेतृत्वामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढले बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:38 IST

प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळालेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले

सोलापूर : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपच्या एकहाती नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा एकदा बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. त्याचेच पडसाद मतदानात उमटल्याचे दिसून येते.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळाले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले. कार्यकर्त्यांचा समन्वय साधत पक्षाला सत्तेपर्यंत आणून सोडले. ग्रामीण भागात विशेषत: भीमा आणि सीना नदीकाठी असलेल्या गावात भाजपविरोधी वातावरण असल्याची चर्चा होती त्याचे पडसाद मतदानात उमटणे अपेक्षित होते तसे घडले नाही.  डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींना या गावातूनही चांगले मताधिक्य मिळाले.

विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात कुठेच ताळमेळ नव्हता. इतकेच काय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेनेने काँग्रेसच्या नेत्यांना साथ दिली; मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप  नेतृत्वाने सेनेला चुचकारण्याचा केलेला प्रयत्न जयसिद्धेश्वर स्वामीजींना मताधिक्य देण्यात उपयोगी ठरला. काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा तालुक्यातील विविध घटकाशी पूर्वी थेट संपर्क होता,  परंतु गेल्या काही वर्षांपासून तो तुटला. त्याचाही फटका शिंदे यांना या निवडणुकीत बसला. नव्या कार्यकर्त्यांशी संबंध प्रस्थापित करण्यात उमेदवार शिंदे आणि काँग्रेसची नेतेमंडळी कमी पडल्याचे प्रचारादरम्यान जाणवत होते, त्यावर पक्षात चर्चाच झाली नाही. याउलट क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून भाजपने या वर्गाला जवळ केले. त्यामुळे यंग ब्रिगेड भाजप उमेदवाराच्या प्रचारात कामी आली.

मतदारसंघातील बंदलगी बंधाºयाचे अर्धवट काम, भीमा नदीवरील वडापूर बॅरेजेस,  भीमा आणि सीना नद्यांना पाणी सोडणे आधी प्रश्नावर सत्ताधाºयांना धारेवर धरण्याची संधी काँग्रेसकडे होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

  दुष्काळी स्थिती असताना तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यात आल्या नाहीत,  अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आहे अशा प्रश्नावर भाजपा नेतृत्वाला घेरण्याची संधी काँग्रेसने गमावली. थकित ऊस बिले लोकमंगल कारखान्याकडून मिळाली नाहीत याची चर्चा काँग्रेसच्या सभातून झाली पण नेत्यांनी तो प्रश्न उचललाच नाही. मोठ्या गावात भाजपाचे नवोदित कार्यकर्ते सक्रिय होते तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचा बोलबाला अधिक होता

काँग्रेससाठी मोठे आव्हानलोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला कमी मते मिळाल्याने आगामी निवडणुकीत पक्षाचे बळ वाढवण्यासाठी प्रथम नेतेमंडळीत मनोमिलन घडवण्याचे मोठे आव्हान संभाव्य उमेदवारासमोर आहे. संघटनात्मक बांधणी करून कामाला लावण्याचे कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. सामान्यांचे प्रश्न घेऊन तालुक्यात गावोगावी सत्ताधाºयांच्या विरोधात जनमत निर्माण करण्याचेही आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांचे रुदन थांबवून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे कामही येत्या तीन महिन्यात करावे लागणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख