शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

सोपल सुटले.. भालके सटकले.. म्हेत्रे मात्र लटकले; ‘करमाळा अन् मध्य’चे सारे इच्छुक रिकामे परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:12 IST

अक्कलकोटमध्ये ‘रयत क्रांती’कडून कल्याणशेट्टी : मोहोळमध्ये ‘अनगर’चाच बोलबाला; माढ्यात बबनदादांच्या हाती अखेर ‘धनुष्यबाण’

सोलापूर : जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाºया अनेक घडामोडी सोमवारी दिवसभर मुंबईत घडल्या. भाजपच्या प्रवेश सोहळ्यात आपले नाव नाही, हे लक्षात येताच पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी तातडीने कॉँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन राष्टÑवादीची  वाट चोखाळली. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे मात्र दिवसभर फोनची      प्रतीक्षा करत मतदारसंघातच थांबले. बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांना शिवसेनेने ए-बी फॉर्म देऊन त्यांचा मार्ग मोकळा केला. दरम्यान, करमाळा अन् मध्य मतदारसंघातील सर्वच इच्छुक उमेदवारांना मातोश्रीवरुन रिकाम्या हाती परतावे लागले. मोहोळमध्ये अनगरच्या सुपुत्राला मोहोळची उमेदवारी देण्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना यश आले असले तरीही माढ्यात आमदार बबनदादा शिंदे यांच्या हाती ‘धनुष्यबाण’ सोपविण्याचे निश्चित झाले   आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काही इच्छुकांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला तर काहींचा जीव अद्याप टांगणीला आहे. मोहोळ मतदारसंघात बंडखोरी निश्चित आहे. शहर मध्य, करमाळा, बार्शी, अक्कलकोट, माळशिरस, माढा येथील युती आणि आघाडीचे उमेदवार कोण असतील याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. इच्छुकांना आणि समर्थकांना मंगळवारी सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

महायुतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले होते. राज्यातील सर्व इच्छुकांना सोमवारी मुंबईत बोलाविण्यात आले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, रश्मी बागल ही मंडळी सोमवारी सकाळी मुंबईत दाखल झाली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमाराला सर्वांना मातोश्री बंगल्यात प्रवेश देण्यात आला. मोहोळ मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल आणि नागनाथ क्षीरसागर इच्छुक होते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेजवाल समर्थक नाराज झाले. 

शहर मध्य आणि करमाळ्याच्या जागेवरील रस्सीखेच सोमवारी रात्रीपर्यंत कायम होती. शहर मध्यसाठी माजी आमदार दिलीप माने, जिल्हाप्रमुख महेश कोठे, करमाळ्यासाठी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल मातोश्रीवर तळ ठोकून होते. इकडे समर्थकांचा जीव टांगणीला होता. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक होईल, लवकरच एबी फॉर्मचा फोटो येईल, असे निरोप दर अर्ध्या तासाला यायचे. यादरम्यान नारायण पाटील राष्टÑवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण करमाळ्यातील पाटील समर्थक इन्कार करीत राहिले. सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रात्री ८.३० च्या सुमाराला उद्धव ठाकरे यांनी सर्व इच्छुकांची भेट घेतली. उमेदवारीबाबत काय करायचे हे तुम्हीच ठरवा. आमच्या सर्व्हेमध्ये ज्याचे नाव येईल त्याचे नाव आम्ही जाहीर करणार आहोत. पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सांगितले. मंगळवारी दुपारी १२.३० नंतर पुन्हा चर्चेच्या फेºया होणार आहेत. 

मोहिते-पाटलांनी पुन्हा कापला उत्तम जानकरांचा पत्ता - उत्तम जानकर यांना माळशिरसऐवजी सातारा जिल्ह्यातील फलटणमधून उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पक्षाकडून निरोप आला आहे. नेमके काय करायचे याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे उत्तम जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. उत्तम जानकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंजूर झाले होते. त्यामुळे जानकर यांना माळशिरसमधून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती, परंतु मोहिते-पाटील गटाने त्यांचा पत्ता कट केला आहे. माळशिरसमध्ये मोहिते-पाटील गटाने निश्चित केलेल्या उमेदवाराला भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे. 

अक्कलकोटमध्ये आता सदाभाऊ खोतांशी संवाद..अक्कलकोटच्या जागेवरून आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात घमासान सुरू होते. म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय सोमवारी झाला नव्हता. जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी सोमवारी सकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे घर गाठले. दुपारी दोन वाजेपर्यंत देशमुख आणि हसापुरे यांच्यात खलबते सुरू होती. पालकमंत्री देशमुख मुंबईतील भाजप नेत्यांशी बोलत होते. पण मतदारसंघ सोडून मुंबईला यायला तयार नव्हते. यादरम्यान पंढरपूर आणि अक्कलकोटची जागा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती पक्षाला सोडण्यात आल्याचा निरोप आला. त्यामुळे सुरेश हसापुरे यांनी ‘जिल्ह्यातील मित्रांकडून’ सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क केला. खोत यांनी त्यांना तातडीने मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला सांगितले. त्यामुळे हसापुरे यांच्यासमवेत काही लोक सोमवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले. याची भनक कल्याणशेट्टी आणि सहकारमंत्री गटातील नेत्यांना लागल्यानंतर त्यांनीही तातडीने हालचाली सुरू केल्या.अखेर या ठिकाणी भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनाच उमेदवारी निश्चित झाली.

नारायण पाटलांना राष्ट्रवादीकडून गळ..- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी निश्चितीसाठी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची पक्ष नेतृत्वासोबत चर्चा सुरू होती. आमदार भारत भालके यांना पंढरपूर मतदारसंघातून उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. शिवसेनेकडून करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांना आला होता. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. माढ्यातून आमदार बबनराव शिंदे लढतील, अशी राष्टÑवादीच्या नेत्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत आशा होती. शिंदे यांनी नकार दिल्यास जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी तयार रहावे, असा निरोप देण्यात आला होता. दरम्यान, बार्शीतून निरंजन भूमकर, सांगोल्यातून दीपक साळुंखे, सोलापूर शहर उत्तरमधून मनोहर सपाटे, मोहोळ मतदारसंघातून यशवंत माने यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ  नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

‘वंचित’चे नेते तौफिक शेख यांना भेटून आले - वंचित बहुजन आघाडीचे भारिपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, युवक अध्यक्ष विक्रांत गायकवाड यांचे शिष्टमंडळ सोमवारी नगरसेवक तौफिक शेख यांना भेटण्यासाठी विजयपूर तुरुंगात गेले होते. या भेटीचा वृत्तांत आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या कानावर घालण्यात आला. ‘लोकमत’शी बोलताना चंदनशिवे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने तौफिक शेख यांच्या पत्नी सोफिया शेख यांना शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आहे. परंतु, तौफिक शेख स्वत:साठी उमेदवारी मागत आहेत. त्यांच्या भेटीचा अहवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात येणार असल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले. 

उमेदवारीबाबत अद्याप मला कोणाकडूनही निरोप आलेला नाही. परंतु, दोन दिवसांत मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहे. - सिद्धाराम म्हेत्रे, आमदार, अक्कलकोट. 

मॅनेज करून उमेदवारी देण्यात आली. मतदारांचा कल पाहून निर्णय घ्यायला हवा होता. मतदार ज्यांना लोक ओळखत नाहीत. त्याला तुम्ही उमेदवारी दिली आहे. तुम्हाला उमेदवार निवडून आणायचा नाही, असे दिसते. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. - मनोज शेजवाल, नगरसेवक, शिवसेना. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण