शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, बाजरीचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:42 IST

पावसाने निराशा : दुर्री जातीची हायब्रीड ज्वारी खावी लागणार

ठळक मुद्देज्वारीच्या उत्पादनात कमालीची घटयंदाच्या रब्बी हंगामात उशिराने अवघ्या १०६ हेक्टर क्षेत्रात ज्वारीच्या पेरण्या बाजरी प्रतिक्विंटल  १७०० ते १९०० रुपये तर ज्वारी प्रतिक्विंटल ३१०० ते ३६०० रुपये भावाने मिळू लागली

करमाळा : सरलेल्या मान्सूनमध्ये पावसाने घोर निराशा केल्याने खरीप हंगामात बाजरीचे पीक वाया गेले तर रब्बी हंगामात ज्वारीची पेर झाली नाही. याचा परिणाम  बाजारात बाजरी व ज्वारीचे भाव कडाडले असून, बाजरी प्रतिक्विंटल  १७०० ते १९०० रुपये तर ज्वारी प्रतिक्विंटल ३१०० ते ३६०० रुपये भावाने मिळू लागली आहे. दुष्काळामुळे आपल्या भागातून बाजरी व ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटल्याने कर्नाटक,आंध्र या शेजारच्या राज्याबरोबर  मराठवाडा, विदर्भातून आयात होणारी दुर्री जातीची हायब्रीड ज्वारी आपल्याला यंदा खावी लागणार आहे.

करमाळा तालुक्यात उजनी धरणामुळे अलीकडील काळात  ऊस व फळबागाचे क्षेत्र वाढलेले असले तरी मूळ ज्वारीचे कोठार म्हणून करमाळ्याची ओळख अद्यापही टिकू न आहे; मात्र यंदा दुष्काळाचा फटका बसल्यामुळे बाजरीसह ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. यामुळे प्राचीन परंपरा लाभलेल्या ज्वारीच्या कोठाराला आता शेजारच्या कर्नाटक,मराठवाडा व विदर्भातून आयात करण्याची वेळ आली आहे. बाजरी खानदेशातून आयात करावी लागत आहे.

यंदाच्या मान्सूनमध्ये  कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगाम घेताच आलेला नाही. खरीप हंगामात येथील शेतकºयांनी ४४४ हेक्टर क्षेत्रात  बाजरीची पेर केली पण पावसामुळे पीक हाती लागले नाही. गतवर्षी ४९८ हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली होती. हेक्टरी पाच क्विंटल प्रमाणे २४९० क्विंटल बाजरीचे उत्पादन घेण्यात आले. यंदा ५०० क्विंटलसुध्दा बाजरी पदरात पडलेली नाही. गत हंगामात  १९ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती हेक्टरी सहा क्विंटलप्रमाणे १ लाख १७ हजार १८० क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले. मागील तीन वर्षांत पाऊसमान विचारात घेता ज्वारीचे उत्पादन बºयापैकी झाले होते, पण यंदा दुुष्काळामुळे ज्वारी उत्पादनात प्रचंड घट आली आहे.

ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट- यंदाच्या रब्बी हंगामात उशिराने अवघ्या १०६ हेक्टर क्षेत्रात ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या आहेत. वेळेवर पाऊस पडला नसल्याने ज्वारीची वाढ खुंटलेली असून उत्पादनात कमालीची घट येणार आहे. त्यामुळे बाजारात दुर्री जातीच्या हायब्रीड ज्वारीची आयात होऊ लागली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार