शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘नांदण्याचं चांदणं’ करणाºया बायकोविरुद्ध सोलापुरातील ११२ पतींची कैफियत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:58 IST

संताजी शिंदे सोलापूर : नांदवण्यास नकार देणाºया सासरच्या त्रासाला कंटाळून पतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी आहे, ...

ठळक मुद्देबायकोविरुद्ध देखील ११२ पतींनी महिला तक्रार निवारण केंद्रात आपली कैफियत मांडलीपतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी ११२ पतींनी पत्नी नांदायला येत नसल्याच्या तक्रारी दिल्या

संताजी शिंदेसोलापूर : नांदवण्यास नकार देणाºया सासरच्या त्रासाला कंटाळून पतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी आहे, मात्र यामध्ये ‘नांदण्याचं चांदणं’ करणाºया बायकोविरुद्ध देखील ११२ पतींनी महिला तक्रार निवारण केंद्रात आपली कैफियत मांडली आहे. 

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महिला तक्रार निवाण केंद्रामार्फत, महिलांवरील अन्याय-अत्याचाराची दखल घेतली जाते. महिलांवरील अन्याय अत्याचाराची दखल घेऊन संबंधित सासरच्या लोकांना बोलावून समज दिली जाते. यापुढे अन्याय करणार नाही, याची लेखी हमी घेतली जाते. शक्यतो पती-पत्नीचे मनपरिवर्तन करून पुन्हा त्यांचा संसार जोडला जातो. महिन्याकाठी २५ ते ३० तक्रारी या महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल होत असतात. जानेवारी २०१८ ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान आलेल्या दाखल झालेल्या तक्रारींमध्ये ११२ पतींनी पत्नी नांदायला येत नसल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. 

एका महिलेला राजकारण आणि सामाजिक कार्य करण्याची आवड आहे, मात्र पतीला ते मान्य नाही. पतीला मान्य नसल्याने पत्नीने थेट माहेरचा रस्ता धरला आहे. पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीला विरह निर्माण झाला असून, ती पुन्हा नांदायला यावी, तिला कोणत्याही गोष्टीने दुखावले जाणार नाही, असा विनंती अर्ज पतीने महिला तक्रार निवारण केंद्रात केला आहे. 

मी पती सोडेन; मात्र सामाजिक कार्य सोडणार नाही, अशी भूमिका सध्या महिलेची आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून चक्क एका पोलिसाने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रारी अर्ज दिला आहे. घरात सासू-सासरे टिकली का लावली नाही? म्हणून भांडतात. मेकअप का केला म्हणून ओरडतात. दिवसा झोपली का म्हणून चिडतात. सासरच्या लोकांचा मला कंटाळा आला आहे, असा आरोप करून पत्नीने पोलीस पतीस नांदण्यास नकार देत आहे. पोलीस पतीने काही झालं तरी माझी बायको माझ्याकडे पाठवा. ती म्हणेल तसा मी वागण्यास तयार आहे, असे तक्रारी अर्जात नमूद केले आहे. 

पत्नी मारहाण करते, मला घटस्फोट पाहिजे...- पत्नी नेहमी टोचून बोलते, मानसिक त्रास देते. छोट्या-छोट्या कारणावरून वाद घालते, मारहाण करते. मी तिच्या त्रासाला खूप कंटाळलो आहे. मला तिच्यापासून घटस्फोट पाहिजे, अशी मागणी करणारा अर्ज एका पतीने महिला तक्रार निवारण केंद्रात दिला आहे. यावर पत्नीने तुला घटस्फोट देत नाही, मात्र मी माझ्या मनासारखंच वागणार, असा दम पतीला भरत असते. पतीने पत्नीच्या त्रासाला मात्र सध्या खूप कंटाळलो आहे, मला न्याय द्या, अशी मागणी तक्रारी अर्जातून केली आहे.

आलेल्या तक्रारीची दखल घेतो, दोघा पती-पत्नीला समोर बोलावून घेतो. वैचारिक मतभेद दूर करतो आणि पुन्हा त्यांचा संसार सुरळीत कसा चालेल, हे पाहत असतो. पत्नींविरुद्ध आलेल्या तक्रारीही सामोपचाराने सोडवण्यावर महिला तक्रार निवारण केंद्राचा भर असतो. -अभय डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसWomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे