आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़ दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी सीसी कॅमेºयातील फुटेजवरून मारेकºयांचा शोध सुरू केला आहे़ प्रकाश अशोक चव्हाण (वय ४४, रा़ अहिल्याबाई शाळा, आदर्श नगर, सोलापूर) असे खून झालेल्या कापड व्यापाºयाचे नाव असून बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़ मयत प्रकाश चव्हाण हे रेडिमेड कापड विक्रेते होते़ सुनील नगरमध्ये ‘कूल वेअर’ नावाचे होजिअरी दुकान आहे़ नेहमीप्रमाणे दुकान उघडून ते आत बसले होते़ दीड वाजण्याच्या सुमारास दोन तरुण दुकानात आले़ त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली. वादविवादात त्या दोघांनी काउंटरवरून आत उडी घेतली आणि धारदार हत्याराने चव्हाण यांच्या पाठीवर आणि हातावर वार केले़ त्यानंतर मारेकºयांनी तेथून तत्काळ पळ काढला़ यानंतर रक्ताळलेल्या स्थितीत चव्हाण हे दुकानातून बाहेर धावत आले़ जवळच पाण्याची टाकी असून या चौकात एका गाडीवर चंद्रशेखर कोळी आणि प्रकाश कोळी हे दोघे गाडीवरील भेळ खात थांबले होते़ ते ‘वाचवा़़़ वाचवा़़़’ म्हणत आले आणि खाली कोसळले़ यावेळी चंद्रशेखर कोळी आणि प्रकाश कोळी या दोघांनी त्याला कोणी मारले, का मारले विचारले असता मारेकºयांना ओळखतो, एवढेच त्यांनी सांगितले़ मारण्याचे कारण त्यांना सांगता आले नाही़ त्या दोघांनी त्यांना तत्काळ रिक्षातून शासकीय रुग्णालयात हलविले़ यावेळी डॉ़ गीता गावडे यांनी त्यास मृत घोषित केले़ मयत चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़
सोलापूर कापड व्यापाºयाचा भरदिवसा खून
By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 18:40 IST
सोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़
सोलापूर कापड व्यापाºयाचा भरदिवसा खून
ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांनी सीसी कॅमेºयातील फुटेजवरून मारेकºयांचा शोध बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़