शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

हॅपी न्यूज ईयर; हॉटेल कामगार होणार सॉलिसिटर; सोलापूरच्या ताहेरचा थरारक प्रवास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:39 IST

संजय द. शिंदे  सोलापूर : तो पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले... वडील वीटभट्टीवर कामगार... घरची परिस्थिती अतिशय ...

ठळक मुद्देताहेरला मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी, कन्नड, तेलुगू, बंगाली, भोजपुरी, ओरिया अशा दहा भाषा अवगत राजस्थानमधील शेरपुरा बिकानेर या बॉर्डर पोस्टवर असताना पाकिस्तान सीमेवर झालेल्या एन्काऊंटरमध्ये त्याचाही सहभाग होतासॉलिसिटर (बॅरिस्टर)  होण्याचे ताहेरचे स्वप्न असून पुढील वर्षी लंडनला जाऊन तो ही पदवी संपादन करणार आहे

संजय द. शिंदे सोलापूर: तो पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले... वडील वीटभट्टीवर कामगार... घरची परिस्थिती अतिशय गरिबीची... शाळेला सुट्ट्या लागल्या की तो हॉटेलमध्ये, कँटिनमध्ये काम करायचा आणि पुढील शिक्षणासाठी पैसे जमवायचा... १२ वी नंतर बीएसएफमध्ये गेला. तेथून स्वेच्छानिवृत्ती घेऊन एलएलबी, एलएलएमसह अनेक पदव्या संपादन केल्या... आणि आज तो पुणे तसेच मुंबई हायकोर्टात वकिली करतोय... आणि स्वप्न आहे लंडनला जाऊन सॉलिसिटर (बॅरिस्टर) होण्याचे. ताहेरखाँ पठाण हे या जिद्दी व्यक्तिमत्त्वाचे नाव.

  सोलापुरात होटगी रोडवरील सद्गुरु नगरमध्ये राहणाºया ताहेरला लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. तो पाच वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. वडील वीटभट्टीवर मजुरी करायचे. अशा हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण आपणच काम करून पूर्ण करायचे असे ठरवून शाळेला सुट्ट्या लागल्या की तो लगेच हॉटेल, कँटिनमध्ये कामाला जायचा. या कामातून मिळालेल्या पैशांचा तो पुढील शिक्षणासाठी वापर करायचा.

सोलापुरातील शांतीनिकेतन हायस्कूलमधून त्याने दहावी उत्तीर्ण केली. सोशल कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलात तो  नोकरीला लागला. जम्मू-काश्मीर, मेघालय, त्रिपुरा, आसाम, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश  आदी ठिकाणी पोस्टिंग असतानाही त्याने शिक्षण सोडले नाही. शिवाजी विद्यापीठातून बहिस्थ विद्यार्थी म्हणून बी.ए., एम. ए. पूर्ण केले. १५ वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन एका कंपनीमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणूनही त्याने काम केले. हे करीत असतानाच पुण्यात भारती विद्यापीठातून त्याने एमएसडब्ल्यू, टिळक विद्यापीठातून एलएलबी, पुणे विद्यापीठातून डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन सायबर लॉ, व्हीआयटी कॉलेजमधून एलएलएम अशा पदव्या संपादन केल्या.  आज तो क्रिमिनल लॉयर म्हणून पुण्यात शिवाजी नगर कोर्ट व मुंबईतील हायकोर्टात वकिली करतोय. युथ इंडिया फाउंडेशनचा कायदेविषयक सल्लागार म्हणूनही तो काम पाहतोय.

सॉलिसिटर होण्याचे स्वप्न- सॉलिसिटर (बॅरिस्टर)  होण्याचे ताहेरचे स्वप्न असून पुढील वर्षी लंडनला जाऊन तो ही पदवी संपादन करणार आहे आणि तसे त्याने नियोजनही केले अहे. ही एक वर्षाची पदवी असून पूर्वीच्या बॅरिस्टर या पदवीला आता सॉलिसिटर या नावाने ओळखले जाते.

दहा भाषा अवगत- ताहेरला मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी, कन्नड, तेलुगू, बंगाली, भोजपुरी, ओरिया अशा दहा भाषा अवगत आहेत.- राजस्थानमधील शेरपुरा बिकानेर या बॉर्डर पोस्टवर असताना पाकिस्तान सीमेवर झालेल्या एन्काऊंटरमध्ये त्याचाही सहभाग होता.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायhotelहॉटेल