शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या ग्रामीण पोलीसांनी टेंभुर्णीतील निष्पाप युवकास ठाण्यातच केली बेदम मारहाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:54 IST

सांगलीतील घटना अद्याप ताजी असतानाच टेंभुर्णी पोलिसांनी त्या घटनेच्या पुनरावृत्तीचे दर्शन घडवित रविवारी एका निष्पाप युवकास पोलीस ठाण्यातच बद-बद बदडले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि २८ : सांगलीतील घटना अद्याप ताजी असतानाच टेंभुर्णी पोलिसांनी त्या घटनेच्या पुनरावृत्तीचे दर्शन घडवित रविवारी एका निष्पाप युवकास पोलीस ठाण्यातच बद-बद बदडले. सहा-सात पोलिसांनी बेल्टने, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करताना बेभान झाले होते. ना आरोपी... ना गुन्हेगार, असे असताना त्याला थर्ड डिग्रीचा वापर केला नाही, एवढेच काय ते कर्तव्य पोलिसांनी बजावले. संतोष उर्फ बापू हणमंत बोडरे (वय २४, रा. आढेगाव, ता. माढा) असे पोलिसांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.  त्याचे असे झाले,  येथील शीतल अपार्टमेंट येथे सराफ असोसिएशन संघटनेचे विजयकुमार कोठारी यांच्याकडे  बोडरे हा  कामास आहे. तो शनिवारी सायंकाळी ६.०० वा. पुणे-सोलापूर महामार्गावर गर्दी का झाली ? हे पाहण्यासाठी गेला होता. तेथे काही जण बस वाहक आणि चालकास मारहाण करीत होते. त्याचे दृश्य तो आपल्या मोबाईलच्या कॅमेºयात बंदिस्त करीत होता. तो घटनेचे चित्रण करीत असतानाच जीपमधून चार-पाच पोलीस तेथे आले. त्यातील एकाने ‘तू फोटो का काढतोस’, असे धमकावत त्याला तेथेच मारहाण करण्यास सुरुवात झाली. एवढ्यावरच जनतेचे रक्षक म्हणून भक्षक बनलेल्या पोलिसांनी त्याला जीपमध्ये डांबले. जीपमध्ये मारहाण करीतच त्याला पोलीस ठाण्यात आणले. ‘सर, माझी काय चूक आहे. सांगा ना मला. मला मारु नका’ अशी विनंती करीत असताना पोलिसांना आली कुठली दयामाया. पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी त्याला कोठडीत बंद करण्याचे आदेश दिले. ढाकणेसह तेथील उपस्थित पोलिसांनी बेल्टने, लाथाबुक्क्याने त्याला बदडून काढले. दरम्यान, विजयकुमार कोठारी हे पोलीस ठाण्यात आले. तेव्हा मारहाणीचा प्रकार सुरु होता. कोठारी यांना पाहताच पोलिसाने आपल्या क्रूरकृत्यास पूर्णविराम दिला. कोठडीत जबर जखमी झालेल्या संतोष बोडरेला उपचारासाठी डॉ. काळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संतोषच्या पाठीवर जोराचा मार बसल्याने मणक्याला सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  ------------------बुधवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर मोर्चाजय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दौलतराव शितोळे यांनी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली व कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी बेजबाबदार पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना दोन दिवसात निलंबित करावे; अन्यथा २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर रामोशी,बेडर,बेरड समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संजय चव्हाण,बंडू माने,भारत जाधव, सुरेश बोडरे, भारत पाटोळे, बापू जाधव, किरण जाधव, कुसुम पाटोळे, राजाबाई बोडरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस