शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकर अनुभवताहेत आठवी संचारबंदी; चौकाचौकात आहे पोलिसांचा फौजफाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:55 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांची संचारबंदी; सोलापूर शहरासह पाच तालुक्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ठळक मुद्देसध्या लावण्यात आलेली संचारबंदी ही आठवी असून ती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कालावधीची आहेपूर्वी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संचारबंदी लागू केली जात होतीयंदा मात्र जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली

सोलापूर : आजपर्यंतच्या कालावधीत सोलापूरकर सध्याची आठवी संचारबंदी अनुभवत आहेत. पूर्वी लॉकअपमध्ये नेले जात होते, मात्र आता संचारबंदीमध्ये रस्त्यावरच कारवाई केली जात आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नव्हे तर कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

सोलापूर शहरात १९६७ साली धार्मिक वादातून दंगल उसळली होती. दंगलीमुळे त्यावेळी शहरातील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. १९७२ साली अशाच पद्धतीचा धार्मिक वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये काही ठराविक भागात कर्फ्यू लावण्यात आला होता. १९७७ साली राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या कारणावरून सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यामुळे शहरात काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. १९८२ साली एका संघटनेच्या कार्यक्रमाच्या कारणावरून दगडफेक व दंगल झाली होती, त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. 

१९९२ साली देशपातळीवर धार्मिक मुद्दा उपस्थित झाल्यामुळे सोलापुरात १९९३ साली दंगल झाली होती. दंगलीला आटोक्यात आणण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सलग पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. २००२ साली जागतिक पातळीवर झालेल्या एका विधानामुळे सोलापुरात दंगल घडली होती. या दंगलीला रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करावी लागली होती. २००६ साली देखील दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगल घडली होती. याही वेळी संचारबंदी लावण्यात आली होती. काही संचारबंदी दोन दिवसांसाठी, काही चार दिवसांसाठी तर काही आठ ते दहा दिवसांसाठी लागू करण्यात आली होती.

सध्या लावण्यात आलेली संचारबंदी ही आठवी असून ती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कालावधीची आहे. पूर्वी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संचारबंदी लागू केली जात होती. यंदा मात्र जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दि. २३ मार्चपासून संचारबंदी लागू झाली होती. ही संचारबंदी जवळपास चाळीस दिवस चालली, त्यानंतर काही प्रमाणात सूट देत देत उठवण्यात आली होती. 

समोरील व्यक्तीच्या जीवासाठी होणार कारवाई

  • - पूर्वीच्या संचारबंदीमध्ये दगडफेक केली म्हणून चाकूहल्ला, तलवारहल्ला केला म्हणून दुसºयाच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून संबंधिताला लॉकअपमध्ये घालून कारवाई केली जात होती. आता जी व्यक्ती रस्त्यावर दिसेल त्याला त्याच्या जीवासाठीच पोलीस कारवाई करणार आहेत. 
  • - पूर्वीच्या संचारबंदीमध्ये दंगेखोरांना घरातून बाहेर काढून चोप दिला जात होता, आता घरात बसा बाहेर येऊ नका, असे सांगून चोप देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. 
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय