शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सोलापुरी शड्डू ; लष्करमधील बक्कर कसाब तालमीला जिमचीही जोड

By appasaheb.patil | Updated: November 21, 2018 16:45 IST

सैन्यांचे आश्रयस्थान होते : अपार मेहनत घेऊन शेकडो मल्ल घडले, दहा वर्र्षांपूर्वी झाले नामांतर

ठळक मुद्देलष्कर भागातील बक्कर कसबा या तालमीला शेकडो वर्षांचा इतिहास व्यायामशाळेत मेहनत करून आजवर येथे शेकडो मल्ल घडले आबादीराजे तालीम संघ म्हणून आज ही तालीम प्रसिद्ध

आप्पासाहेब पाटील सोलापूर : ब्रिटिश लष्कराच्या सैन्यांचे आश्रयस्थान असलेल्या लष्कर भागातील बक्कर कसबा या तालमीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या व्यायामशाळेत मेहनत करून आजवर येथे शेकडो मल्ल घडले आहेत. आता तालमीला आधुनिकतेची जोड देण्यात आली असून, शेजारील खोलीत सुसज्ज जिमही उभारण्यात आले आहे. आबादीराजे तालीम संघ म्हणून आज ही तालीम प्रसिद्ध आहे.

सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्यासमोर १०० वर्षे पार केलेली बक्कर कसाब तालीम आहे़ एका छोट्याशा जागेत स्थापन झालेल्या तालमीत आजच्या घडीला शेकडो मल्ल सराव करीत आपले शरीर पिळदार बनवित आहेत़ ब्रिटिशांच्या काळात लष्कराच्या सैन्यांनी या परिसरात वास्तव्य करून या तालमीत व्यायाम केल्याचे परिसरातील ज्येष्ठ पैलवानांनी सांगितले़ १९५१ साली या तालमीचे पैलवान निजामोद्दीन हाजीहुसेनसाब आबादीराजे यांची कुस्ती झाली होती़ या तालमीला आजपर्यंत हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीच्या अनेक पैलवानांनी भेटी दिल्या आहेत.

यात इस्माईल शेख, आप्पालाल शेख यांच्यासह अन्य पैलवानांचा समावेश आहे़ या तालमीत निजामोद्दीन आबादीराजे, महामूद कुरेशी, बाशा शेख, पोलीस कॉन्स्टेबल नाईकवाडी, अब्दुल अजीज जमादार, अब्दुल करीम शेख, गुलाम कुरेशी, दिलावर कुरेशी, संभाजी परळकर यांनी सराव करीत ठिकठिकाणच्या स्पर्धांत यश मिळविले़ सध्याच्या काळात फिजाउद्दीन आबादीराजे, शौकत पठाण, आप्पाराव कलागते, अय्युब शेख, महादेव मोरे, भागवत मोरे, सोमनाथ शिंदे, महंमद शेख, फकरुद्दीन जमादार, शब्बीर काझी आदींनी तालमीचे वैभव जपण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले़ या तालमीत संभाजी परळकर व अब्दुल लतिफ यांनी खलिफाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली.

आबादीराजेंचे योगदान- १०० वर्षे पूर्ण केलेल्या तालमीचे १० वर्षांपूर्वी आबादीराजे तालीम संघ असे नामांतर करण्यात आले़ या तालमीला वैभव प्राप्त करून देण्याबरोबर सेवासुविधा पोहोचविण्यात आबादीराजे कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे़ पैलवान निजामोद्दीन हाजी हुसेनसाब आबादीराजे हे मागील ९१ वर्षांपासून या तालमीत सराव करतात़ दरम्यान, फिजाउद्दीन आबादीराजे हे सध्या तालमीचे काम पाहत आहेत़ आबादीराजे कुटुंबीयांनी या तालमीला पाणी, वीज अशा सेवासुविधा मोफत पुरवित आहेत़ 

माझा जन्म १९२९ साली झाला़ मागील ९१ वर्षांपासून मी या तालमीत सराव करीत आहे़ या तालमीत माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्ल तयार झाले़ अनेकांनी वेगवेगळ्या स्पर्धांत सहभाग घेऊन यशस्वी कामगिरी केली़ आज या तालमीचे नाव आबादीराजे तालीम संघ असे आहे़ या तालमीत पाणी, वीज व इतर सेवासुविधा पुरविण्यासाठी आमचे कुटुंबीय प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. - निजामोद्दीन हाजी हुसेनसाब आबादीराजे, पैलवान, लष्कर

टॅग्स :Solapurसोलापूर