शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सोलापुरी शड्डू ; लोकवर्गणीतून बदलला पाणीवेस तालमीचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:09 IST

ऐतिहासिक आखाडा : १९३० च्या मार्शल लॉमध्ये तालमीतील कार्यकर्त्यांचा सहभाग

ठळक मुद्दे मार्शल लॉ विरोधाच्या लढ्यात पाणीवेस तालमीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग सोलापूरच्या इतिहासाची साक्ष देणाºया या तालमीमधून अनेक नामवंत मल्ल घडलेतरुण कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली ही तालीम बारा बलुतेदारांचे आजही प्रतिनिधित्व करीत आहे

राजकुमार सारोळे सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९३० मध्ये आलेल्या मार्शल लॉ विरोधाच्या लढ्यात पाणीवेस तालमीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सोलापूरच्या इतिहासाची साक्ष देणाºया या तालमीमधून अनेक नामवंत मल्ल घडले. दोनशे वर्षांपूर्वी या परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली ही तालीम बारा बलुतेदारांचे आजही प्रतिनिधित्व करीत आहे. 

पाणीवेस स्थापन करण्यामागे कृष्णात साठे यांनी पुढाकार घेतला होता. या परिसरात गिरणी कामगार मोठ्या प्रमाणावर राहत होते. यामध्ये गुरव, मराठा, लिंगायत, मुस्लीम अशा सर्व समाजातील लोकांचा रहिवास या परिसरात होता. पाणीवेस तालमीची स्थापना झाल्यावर सर्वसमावेशक तरुणांचा सहभाग वाढला. त्यामुळे या तालमीतून नामवंत कुस्तीपटू तयार झाले. इंग्रज सरकारने लादलेल्या मार्शल लॉ ला विरोध सुरू होता. या लढ्यात सोलापुरातील कोर्ट जाळण्यात आले होते. या प्रकरणात पाणीवेस तालमीचे कार्यकर्ते तोत्रा नारायण पवार यांचा सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्रामातही पाणीवेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

पाणीवेसमधून हिंद व महाराष्ट्र केसरी किताब मिळविणाºयांमध्ये दामोदर वानकर, रेवप्पा परळकर, अंबादास फुलारी, गंगाराम परळकर, पंढरीनाथ पवार, शंकर शिंदे, पंढरीनाथ फुलारी, विठ्ठल घाडगे, तानाजी अंजीखाने या पैलवानांचा समावेश आहे.पाणीवेस तालमीने भूकंपग्रस्त, पूरग्रस्तांच्या मदतीसह अनेक सामाजिक कामे केली आहेत.  स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यावर याची प्रेरणा घेऊन पाणीवेस परिसरातील तरुण कार्यकर्ते काशिनाथ वानकर, हरिबा परीट, तोत्रा नारायण पवार, शंकरराव शिंदे, लक्ष्मण शिंदे अशा कार्यकर्त्यांनी १९१६ मध्ये पाणीवेस गणेशोत्सवाची स्थापना केली. 

 तालमीचे काम दामोदर वानकर, दगडोबा घोडके, शिवा पवार, शिवशंकर झुंजे, बाबू फुलारी, लक्ष्मण शिंदे, बाबुराव शिंदे, महिबूब पठाण पैलवान अशा कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवले. त्यानंतर रामकृष्ण वानकर, अभिमन्यू शिंदे, किसन गवळी, नामदेवराव नलावडे, हरिभाऊ घोडके, विठ्ठल घाडगे, बाबासाहेब कणबसकर, संगमेश्वर झुंजे, तुकाराम गायकवाड, सूर्यभान काशिद, शिवाजी कोलते, लक्ष्मण गुळवे, प्रकाश झुंजे, गामा पैलवान यांनी स्वातंत्र्यानंतर तालीम व गणेशोत्सवाची परंपरा जपली. अलीकडच्या काळात लक्ष्मण नलावडे, भारत वानकर, सुभाष शिरसट, आदिनाथ बोरगावकर, तानाजी पवार, भारत गोले, मोरे बंधू, दत्तात्रय पैलवान, चन्नप्पा हरसुरे, बंडोबा पवार, संजय वानकर, कांबळे पेंटर, माजी नगरसेवक विठ्ठल ननवरे यांनी धुरा सांभाळली. आता तालमीचे नेतृत्व चंद्रकांत वानकर हे करीत आहेत, असे संचालक दत्तात्रय घाडगे यांनी सांगितले. 

तालमीच्या दर्शनी भागात वाचनालयच्स्थापनेवेळी तालमीच्या भिंती दगडी तर पत्र्याचे छत होते. १९८५ च्या दरम्यान दामोदरपंत वानकर यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून पहिला मजला उभा केला. त्यानंतर पुढील पाच वर्षांत दुसरा मजला चढवून आधुनिकतेची कास धरत नवतरुणांसाठी जिमची व्यवस्था केली. . तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुढील भागात वाचनालय सुरू करण्यात आले. 

तालीम म्हटले की, वस्ताद व पैलवानांची परंपरा डोळ्यांसमोर येते. पण आताचे तरुण तालमीमध्ये येण्यास तयार नाहीत. त्यामुळे जिमची व्यवस्था केली आहे. नवे कुस्तीपट्टू तयार व्हावेत या उद्देशाने पाणीवेस तालीम शिवजयंतीवेळी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. तसेच आखाड्यातील स्पर्धांना सहकार्य करीत आहोत.  - चंद्रकांत वानकरआधारस्तंभ, पाणीवेस तालीम 

टॅग्स :Solapurसोलापूर