शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाच्या माहितीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्यालाही मोजावे लागणार सहा हजार रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:14 IST

अधिकाºयाकडून प्रथम टाळाटाळ : सचिवाकडून केला ‘आरटीआय’ अर्ज

ठळक मुद्देआषाढी यात्रेत झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खर्चाबाबत पक्षनेते आनंद तानवडे यांनी अधिकाºयांकडे माहिती मागविलीया अर्जानुसार माहिती देण्यासाठी अधिकाºयाने झेरॉक्सचा खर्च म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली

सोलापूर : आषाढी यात्रेत झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खर्चाबाबत पक्षनेते आनंद तानवडे यांनी अधिकाºयांकडे माहिती मागविली; पण ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर तानवडे यांनी आपल्या सचिवामार्फत माहिती अधिकाराखाली अर्ज केला. या अर्जानुसार माहिती देण्यासाठी अधिकाºयाने झेरॉक्सचा खर्च म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली. तानवडे यांनी हा खर्च देण्याची आता तयारी दर्शविली आहे.

आषाढी यात्रेत झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खर्चाबाबत पक्षनेते आनंद तानवडे यांनी माहिती मागूनही अधिकाºयांनी दिली नाही म्हणून सचिवाने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीला झेरॉक्सचा खर्च सहा हजार रुपये सांगण्यात आला आहे. आषाढी यात्रेवेळी झेडपीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे पालखी मार्गावरील स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. यासाठी दरवर्षी शासनाकडून काही निधी दिला जातो. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास मिळतो. त्याप्रमाणे जी कार्यालये पालखी मार्गावरील व्यवस्थेचे नियोजन करतात त्या कार्यालयांना या निधीचे वितरण होते.

झेडपीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे पालखी मार्गावर पाणीपुरवठा, वारकºयांनी फिरते शौचालय, स्वच्छतेसाठी झाडू, हातमोजे, टी शर्ट, मास्क आणि कचरा संकलनासाठी खर्च करण्यात आला. यात्रा संपल्यावर पक्षनेते आनंद तानवडे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांना पत्र देऊन माहिती मागविली. पण त्यांनी शासनाकडून मिळणाºया निधीबाबत माहिती निरंक म्हणून उत्तर दिले. त्यानंतर सदस्य अरुण तोडकर यांनीही या खर्चाबाबत माहिती देण्याबाबत पत्र दिले. पण दोन महिन्यांत या पत्राला उत्तर आले नाही. 

खर्चाची माहिती घेण्यासाठी पक्षनेते आनंद तानवडे यांनी सचिव सूर्यकांत कोरे यांना माहितीच्या अधिकाराचे पत्र देण्याबाबत सूचना केली. त्यानुसार कोरे यांनी माहिती मागितली. त्यावर पाणीपुरवठा विभागाने आषाढी वारी काळात झेडपीने केलेल्या नियोजन व खर्चाबाबतची सर्व तपशीलवार माहिती देण्यासाठी संबंधित कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी आलेला सहा हजारांचा खर्च मागितला. त्यानंतर हा खर्च कोणी भरायचा यावरून तानवडे व तोडकर यांच्याकडून माहिती घेण्यात आलेली नाही. पण प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे या खर्चाबाबत काहीतरी गडबडी असल्याचा सुगावा पदाधिकाºयांना लागला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत बाहेरून माहिती घेतली जात आहे. आता प्रशासनाकडून कोणती माहिती मिळणार आहे याचा पंचनामा करण्यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. 

आषाढी यात्रेत पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत झेडपी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व शासन निधीबाबत माहिती देण्याचे पत्र दिले होते. पण संबंधित विभागाने माहिती न दिल्याने माहिती अधिकाराचा वापर केला आहे. योग्य वेळ आल्यावर यावर बोलेन.-आनंद तानवडे, पक्षनेते झेडपी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता