शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सोलापूरचा युवक तीन महिन्यांपासून नेपाळमध्ये बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:36 IST

हतबल मायबाप लेकराच्या शोधात : पोलिसांचाही शोध सुरू; सरकारने हस्तक्षेप करण्याची कुटुंबाची मागणी

ठळक मुद्देरोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेलानेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी  हे दुष्काळाच्या छायेतील गाव़ संसाराला हातभार लागाव म्हणून वडील  बाळू साठे यांनी विकासला कामासाठी नेपाळमध्ये पाठवले. तेथे गेल्यापासून तो संपर्कात होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्कच होईना. तो बेपत्ता झाला की काय या चिंतेत त्याच्या कुटूंबातील सदस्य बसले आहेत. राज्य सरकारने त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी साठे कुटूंबीयाने केली आहे. 

अपंग वडील, आई, तीन भाऊ, दोन बहिणी असे हे साठे कुटुंब़ त्यातील थोरला भाऊ सागर आपले कुटुंब व आईला घेऊन ऊस तोडणीसाठी कोल्हापुरातील कागलच्या साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेला़ एका बहिणीचे लग्न झाले व ती बाळंतपणासाठी गावाकडे आली. वडील, दोन लहान भाऊ व एक बहीण घरीच होते. पैशाची चणचण वाढू लागली़ बहिणीच्या बाळंतपणाचा खर्च भागविण्यासाठी वडील बाळू साठे यांनी गावातील दीपक गोडसे यांच्याकडून पैसे घेऊन १६ वर्षीय विकासला जानेवारी २०१८ मध्ये कामासाठी नेपाळला पाठवले़ तो तेथे गेल्यानंतर कुटुंबाच्या संपर्कात होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क होईना अन् इकडे त्याचे मायबाप लेकराच्या शोधात हतबल झाले आहेत़ 

शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती कायम असते. घरच्या परिस्थितीमुळे कोवळ्या वयातच शिक्षणाला रामराम ठोकून ही मुले रोजगाराच्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडतात़ सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिंगोर्णी गावातील विकास साठे हाही रोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला. 

१२ जानेवारी २०१८ रोजी तो नेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ त्यानंतर मे २०१८ पर्यंत त्याचा संपर्क होत होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क नाही़ त्यानंतर विकासच्या आईने दीपक गोडसे यांना संपर्क करून माहिती विचारली असता तो आपल्याबरोबर नाही, असे उत्तर मिळाले़ त्यानंतर त्याच्या आईने माळशिरस पोलीस ठाणे गाठले़ पोलिसांकडे मदतीची अपेक्षा केली़ मात्र अपुºया माहितीमुळे पोलिसांनाही तपासाची दिशा मिळेना़ 

मदतीची अपेक्षाच्साठे कुटुंबातील आई, वडील, भाऊ हे नेपाळमध्ये हरवलेल्या विकास साठे याचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहेत, मात्र त्यांना लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाकडून ठोस दिशा मिळत नाही. यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे हतबल कुटुंब करीत आहे़ कारण तेथील सरकारशी बोलणी झाल्यानंतरच यातून मार्ग निघणार आहे. सध्या विकास हा तेथून निघून गेला की चुकला, भाषेची अडचण, कोणाला भेटावे व यात कोण मदत करेल? असा प्रश्न साठे कुटुंबाला पडला आहे़ 

आम्ही ऊस तोडणीसाठी गेलो असता माझा भाऊ विकास हा कामासाठी वडिलांना सांगून दीपक गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला़ मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो संपर्कात नाही़ शिवाय तो गोडसे यांच्याबरोबरही नाही़ मग तो कोठे असेल? काय करीत असेल? असा प्रश्न पडतोय़ आता माझा भाऊ शोधण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे़- सागर साठे, विकासचा भाऊ 

टॅग्स :SolapurसोलापूरNepalनेपाळSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस