शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या महिला महापौरांनी केला माझ्यावर विष प्रयोग; भाजप नगरसेवकाचा खळबळजनक गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 13:12 IST

अविनाश महागावकर, अशोक निंबर्गी यांच्यासह महापौरांच्या पतीचेही नाव

ठळक मुद्देसुरेश पाटील यांनी संशयितांची नावे असलेला जबाब जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात दिलाजबाब देऊनही आपली फिर्याद का दाखल करुन घेतली जात नाही, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे

सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाठी यांनी आपल्याला विष घातले, असा खळबळजनक आरोप महापालिकेतील भाजपचे माजी सभागृहनेते अन नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 थेलियम विषबाधा प्रकरणी सुरेश पाटील यांनी संशयितांची नावे असलेला जबाब जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात दिला आहे. या जबाबात अनेक मातब्बर  मंडळींची नावे असून यासंदर्भात सुरेश पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला. दरम्यान, जबाब देऊनही आपली फिर्याद का दाखल करुन घेतली जात नाही, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.

६ डिसेंबर २०१७ रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे व नंतर मुंबईला हलविले होते. मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाटील यांचे चिरंजीव बिपीन पाटील यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक चौकशीसाठी हे प्रकरण सीआयडीकडे दिल्याची घोषणा केली होती. पण ९ महिन्यांत सीआयडीची चौकशी रखडली. त्यामुळे  सभागृहनेते संजय कोळी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 

दरम्यान, अठरा दिवसांपूर्वी सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतर शहर पोलिसांनी सुरेश पाटील यांच्याशी संवाद साधून या प्रकरणाची अधिक माहिती घेतली होती.त्यानंतर नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषबाधाप्रकरणी जोडभावीपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असता, संशयितांची नावे सांगण्यास सुरेश पाटील यांनी मुदत मागितली होती. शनिवारी रात्री नगरसेवक सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी संशयित असलेल्या लोकांची नावे आपल्या जबाबात जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडगे यांना दिली आहेत. माझ्यावर झालेल्या विषप्रयोग प्रकरणी मी दिलेला जबाब ग्राह्य धरुन तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, जबाबातील नावे मोठी असल्यामुळे पोलिसांनी अद्याप चौकशीच्या नावाखाली कारवाई केली नसावी, अशी प्रतिक्रिया सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

   दरम्यान, नगरसेवक सुरेश पाटील यांनी मागितलेल्या वेळेनंतर संशयितांची नावे बंद लिफाफ्यातून दिली आहेत. सुरू असलेला तपास आणि मिळालेली नावे याचा अहवाल तयार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जोडभावीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस