शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामासाठी ८२ दुकाने हलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:08 IST

सोलापूर : पंचकट्टा ते विजापूर वेस असा १८ मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी मोजणी करून खुणा करण्याचे काम करण्यात आले. शनिवारी या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून पंचकट्टा ते विजापूर वेस तेथून लक्ष्मी मार्केटकडील मारुती मंदिर आणि तेथून परत पंचकट्टा अशा त्रिकोणी भागातील रस्ता स्मार्ट करण्यात येणार आहे. पंचकट्टा ...

ठळक मुद्देमहिला हॉस्पिटल ते कुमठा नाकापर्यंतचा रस्ता नगरोत्थान योजनेतूनदुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत नोटिसीला उत्तरस्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी

सोलापूर : पंचकट्टा ते विजापूर वेस असा १८ मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी मोजणी करून खुणा करण्याचे काम करण्यात आले. शनिवारी या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. 

स्मार्ट सिटी योजनेतून पंचकट्टा ते विजापूर वेस तेथून लक्ष्मी मार्केटकडील मारुती मंदिर आणि तेथून परत पंचकट्टा अशा त्रिकोणी भागातील रस्ता स्मार्ट करण्यात येणार आहे. पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावर ८२ दुकाने आहेत. येथील मूळ रस्ता २४ मीटरचा आहे. पण दुकानांच्या अतिक्रमणामुळे इतकी रुंदी उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेने यापूर्वीच येथील दुकानदारांना रस्ता मोकळा करण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्यावर दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत नोटिसीला उत्तर देत स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखविली आहे. 

त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे मोजमाप करण्याची मोहीम घेण्यात आली. बांधकाम विभागातील कर्मचाºयांनी रस्त्याच्या मध्यापासून १८ मीटरची रुंदी घेत दुकानांपर्यंतची हद्द निश्चित केली. या हद्दीपर्यंतचे अतिक्रमण काढून घ्यावे अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. मोजमाप घेण्याचे काम सायंकाळपर्यंत चालले. आणखी काम राहिलेले असून, शुक्रवारी मोहीम घेतली जाणार असल्याचे परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. मोजमाप पूर्ण झाल्यानंतर शनिवारी निश्चित केलेल्या हद्दीपर्यंत रस्ता मोकळा करण्याची मोहीम घेतली जाणार आहे. 

राजेश्वर नगरसाठी रस्ता खोदला- महिला हॉस्पिटल ते कुमठा नाकापर्यंतचा रस्ता नगरोत्थान योजनेतून केला आहे. ड्रेनेज चेंबरसाठी हा रस्ता दोनवेळा खोदण्यात आला. राजेश्वर नगरमधील ड्रेनेज चोकअप होत असल्याने मोठी लाईन घालण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आल्याचे सांगण्यात आले. मनपा कर्मचाºयांच्या वसाहतीसाठी ही तत्परता दाखविण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका