शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:32 IST

केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे. 

ठळक मुद्देजागतिक स्तरावर भारत व युरोपातील प्रत्येकी १२ शहरे निवडून भारतातील प्रत्येक शहराची युरोपातील शहराबरोबर जोडी लावण्यात येणार युरोपियन युनियनच्या मदतीने केंद्र शासनाने शाश्वत नागरी विकास योजना तयार केली केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेंतर्गत नेमून दिलेल्या युरोपातील शहरांचे प्रतिनिधी मंडळ सोलापुरात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करणे, उद्यानांची संख्या वाढविणे, लोकांना दैनंदिन स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे, शहरात अद्ययावत ड्रेनेजची सुविधा देणे अशा सुविधा देऊन एक आदर्श शहर निर्माण करणे यासाठी जागतिक स्तरावर भारत व युरोपातील प्रत्येकी १२ शहरे निवडून भारतातील प्रत्येक शहराची युरोपातील शहराबरोबर जोडी लावण्यात येणार आहे. अशाप्रकारे युरोपातील शहर व भारतातील शहर यांचा संयुक्त अभ्यास करून आपले शहर विकसित करण्यासाठी प्रस्ताव देण्याबाबत सोलापूर मनपास युरोपियन युनियनचे पत्र आले होते. या योजनेसाठी आवश्यक असणारा नोंदणी अर्ज भरून आयुक्त व माझ्या स्वाक्षरीने युरोपियन युनियनकडे आॅक्टोबर २०१७ मध्ये पाठविण्यात आले होता. या अर्जावरून या योजनेसाठी सोलापूरची निवड झाल्याचे पत्र १५ जानेवारी रोजी युनियनचे पहिले कौन्सिलर हेनरीट फारेज यांनी मनपाला पाठविले आहे, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले. युरोपियन युनियनच्या मदतीने केंद्र शासनाने शाश्वत नागरी विकास योजना तयार केली आहे. या योजनेत शहराचा विकास करताना युरोपातील शहरांचा अभ्यास करून नागरी सुविधांमध्ये सुधारणा कशा पद्धतीने करावयाची हे ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेत सोलापूरची निवड झाल्याने मोठा फायदा होणार असल्याचे बनशेट्टी यांनी सांगितले. या योजनेतून शहरातील औद्योगिक, सांस्कृतिक, शौक्षणिक बाबींमध्ये देवाण-घेवाण करता येणार आहे. सोलापूर शहराचा नागरी विकास हा जागतिक स्तराप्रमाणे होण्यास या योजनेचा उपयोग होईल. या योजनेतून श्री सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला, धर्मवीर संभाजी तलाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास शहराच्या गुणवत्तेमध्ये भर पडेल. आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित ठेवल्यास वरील सर्व गोष्टी साध्य होणार आहेत.---------------------अशी होणार सुरुवात केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेंतर्गत नेमून दिलेल्या युरोपातील शहरांचे प्रतिनिधी मंडळ सोलापुरात येणार आहे. त्याचबरोबर युरोपातील शहरांचा विकास पाहण्यासाठी येथील प्रतिनिधी मंडळ युरोपामध्ये जाणार आहे. वातावरण, ऊर्जा आणि पर्यावरण बदल यावर या योजनेत भर दिला जाणार आहे. यासाठी येत्या काही दिवसात याबाबत विशेष उपक्रम घेतला जाणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका