शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाचा युवा महोत्सव?

By संताजी शिंदे | Updated: August 25, 2023 13:24 IST

१९ वा महोत्सव : महाविद्यालय झाले फायनल, लवकरच होणार घोषणा!

संताजी शिंदे, सोलापूर : तरुणाई जल्लोष असलेला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव, सप्टेंबर शेवटच्या किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी विकास विभागाने महोत्सवासाठी ग्रामीण भागातील एका महाविद्यालयाची निवडही केली आहे. लवकरच महाविद्यालयाचे नाव व तारीख जाहीर होणार आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा अंतर्गत असलेल्या विद्यार्थी विकास विभागाने, युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागवले होते. एका महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, तो अंतिम करण्यात आला आहे. ११ तालुक्यापैकी कोणत्या महाविद्यालयाला यजमानपद मिळाले आहे हे सध्यातरी समजू शकले नाही. येत्या चार ते पाच दिवसामध्ये महाविद्यालयाचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. ३ ते ४ दिवसाचा हा युवा महोत्सव असणार असून यामध्ये तरूणाईच्या कलागुणांचा आविष्कार होणार आहे.

७० ते ७५ विद्यालयाचा असणार सहभाग

जिल्ह्यातील ११० महाविद्यालये हे विद्यापीठाशी संलग्नीत आहेत. युवा महोत्सवात प्रतिवर्षी ६५ ते ७५ महाविद्यालयाचा सहभाग असताे, यंदाच्या वर्षीही ७० ते ७५ महाविद्यालय सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बहुतांश महाविद्यालयांनी युवा महोत्सवाच्या तयारीला सुरूवातही केली आहे.

युवा महोत्सवासाठी महाविद्यालय फायनल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालय असून त्याची लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. महोत्सवाचे वेळापत्रकही तयार करण्यात येत आहे. कुलगुरूंच्या परवानगीने सर्व माहिती सांगितली जाईल. -केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

टॅग्स :Solapurसोलापूरuniversityविद्यापीठ