शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद : सरकारी योजनेला सोलापूरच्या सिद्धेश्वरांचे नाव देऊन होणार सन्मान, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 14:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध्देश्वर महाराज यांचे नाव येऊ शकेल, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देशासनाने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केल्यानंतर काही समाजकंटक त्याचे राजकारण करीत आहेतबसवेश्वर आणि सिध्देश्वर यांचाही तोलामोलाचा सन्मान होणार पुणे विभागात ८२३ गावांची निवड

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध्देश्वर महाराज यांचे नाव येऊ शकेल, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि सिध्देश्वर हे सर्व महादेव भक्त आहेत. शासनाने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केल्यानंतर काही समाजकंटक त्याचे राजकारण करीत आहेत. बसवेश्वर आणि सिध्देश्वर यांचाही तोलामोलाचा सन्मान होणार आहे. धनगर आरक्षण आंदोलनात विद्यापीठाच्या नामकरणाबाबत मागणी करण्यात आली होती. इतर मागण्याही पूर्ण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेत पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कामे उत्कृष्ट आहेत. सांगली जिल्हा मागे आहे. शेतकºयांसाठी मूलभूत, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते. ----------------------पुणे विभागात ८२३ गावांची निवडजलयुक्त शिवारमधून २०१७-१८ मध्ये पुणे विभागात ८२३ गावांची निवड करण्यात आली आहे. गावस्तरावर पाणलोटाचे मॅप तयार करण्यात आले आहेत. ग्रामस्तरावर १४ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात गावस्तरावरील सरासरी पाच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. -----------------गडकरींमुळे स्थिरीकरणाबद्दल आशाकृष्णा-भीमा आणि सीना स्थिरीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. हा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे आहे. सुदैैवाने नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते आहे. त्यांच्याकडे हा विषय विचाराधीन आहे. त्यांनी या विषयांबाबत बजेटची तरतूदही केली आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.