शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; ‘नको ‘खड्डायात्रा’.. आम्हाला हवी ‘गड्डायात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 10:53 IST

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा महिन्यावर येऊन ठेपली असताना होम मैदान आणि रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ...

ठळक मुद्देस्मार्ट रस्त्याच्या कामामुळे हरिभाई देवकरण प्रशाला, होम मैदान परिसर, डफरीन चौक या भागात धुळीचे प्रमाण वाढलेयंदा मात्र आम्हाला चांगला रस्ता मिळावा, अशा अपेक्षा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा महिन्यावर येऊन ठेपली असताना होम मैदान आणि रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या स्मार्ट रोडचे काम वेळेत पूर्ण होणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. रंगभवन ते होम मैदान हा रस्ता सध्या दुचाकींसाठी खुला आहे. परंतु, हरिभाई देवकरण प्रशाला ते डफरीन चौक या मार्गावर खोदून ठेवलेले खड्डे आहे तसेच आहेत. मागील वर्षी खड्डे मार्गातून गड्डायात्रा करावी लागली. यंदा मात्र आम्हाला चांगला रस्ता मिळावा, अशा अपेक्षा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. 

स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे हरिभाई देवकरण प्रशाला, होम मैदान परिसर, डफरीन चौक या भागात धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. रंगभवन चौकात तर खूपच धूळ असते. ज्या लोकांना अ‍ॅलर्जी, दमा आहे त्यांचा त्रास आणखी वाढला आहे. स्मार्ट सिटीची कामेही स्मार्ट पद्धतीने व्हायला हवीत. उद्या त्यातून आनंद मिळेल. पण आज त्यांना जो त्रास होईल त्याची भरपाई कशी मिळेल. या दुष्परिणामांचा विचार व्हायला हवा. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून सोलापूरकरांची सुटका करा. - डॉ. सुरेश व्यवहारे, रोटरी क्लब

मागील वर्षी धुळीच्या रस्त्यावरून मार्ग काढत गड्डायात्रेला जावे लागले होते. पुढच्या गड्डायात्रेपर्यंत होम मैदान आणि रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात तर तसे दिसत नाही. आम्हाला यंदा ‘खड्डायात्रा’ नव्हे तर चांगली ‘गड्डायात्रा’ हवी आहे. होम मैदानावर चांगली कामे होत असल्याचे दिसते. परंतु, ही कामे वेळेवर झाली तरच त्याला अर्थ आहे. ठेकेदाराच्या मागे लागून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. - सुनील चव्हाण, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना. 

शहरातील जो भाग प्राइम लोकॅलिटी म्हणून ओळखला जातो तो दोन वर्षे बंद ठेवणे चुकीचे आहे. मागील वर्षी गड्डायात्रेसाठी रंगभवन ते होम मैदान येथील रस्ता खुला केल्यानंतर प्रचंड धूळ पाहायला मिळाली. यावर्षी डिसेंबरअखेर तुम्ही हा रस्ता पुन्हा खुला करणार असल्याचे सांगत आहात. मागील वर्षीप्रमाणे यंदा धूळ होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कामाचा वेग का वाढत नाही हे एकदा सोलापूरकरांना सांगा. -अ‍ॅड. सरोजनी तमशेट्टी. 

ग्रामदैवत सिद्धेश्वराची गड्डायात्रा ही या शहराचे वैभव आहे. स्मार्ट रस्त्याच्या कामाचे थ्रीडी वर्क आम्ही पाहिले आहे. हे काम गड्डायात्रेपूर्वी पूर्ण झाले तर सोलापूरकरांना या स्मार्ट रस्त्यावरून गड्डायात्रेला येणे नक्कीच आवडेल. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यामुळे अनेक चांगली कामे होताना दिसून येत आहे. गड्डायात्रेपूर्वी त्यांनी स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण करून घेतल्यास सोलापूरकरांना निश्चितच आनंद होईल. - सिद्धाराम डोमनाळे, उद्योजक. 

होम मैदानावर जाण्यासाठी डफरीन चौकाच्या बाजूकडील रस्त्याचाही वापर होतो. मागील वर्षी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. पायी जाताना आम्हाला धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. आतापासून तयारी केली तर मागील वर्षीप्रमाणे त्रास होणार नाही. होम मैदानावरही चांगले काम होत असल्याचे समाधान आहे, पण ते गड्डायात्रेपूर्वी पूर्ण करा. - वैशाली डोंबाळे, शिक्षिका. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी