शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज आडवे न करता पूजा स्वीकारणार; यंदा अक्षता सोहळा दीड वाजताच संपविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:48 IST

हिरेहब्बूंचा ऐतिहासिक निर्णय : बैठकीत ‘लोकमत’चाही उल्लेख; बाराबंदीधारकांनी इतरत्र फिरू नये

ठळक मुद्देयंदा १५ मानकºयांच्या वतीने नंदीध्वजास एकच खोबºयाचा हार पूर्वी यात्रा अगदी वेळेत व्हायची. तीच परंपरा पुन्हा यात्रेत आणण्याची शपथयात्रा वेळेत पार पाडण्यासाठी एकप्रकारची आचारसंहिताच त्यांनी भक्तगणांना घालून दिली

सोलापूर : यंदा प्रथमच मिरवणूक मार्गांवर नंदीध्वज आडवे न करता भाविकांकडून पूजा स्वीकारली जाईल.  तसेच अक्षता सोहळ्यादिवशी दुपारी दीडच्या आत अक्षता सोहळा संपविणार असल्याचाही ऐतिहासिक निर्णय मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी जाहीर करताच सिद्धरामेश्वर भक्तगणांनी ‘बोला, बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र... सिद्धेश्वर महाराज की जय’चा जयघोषात या निर्णयाचे स्वागत केले. 

सकाळी साडेनऊ-दहापासून संमती कट्टा परिसरात ताटकळत बसलेले भाविक. महिला, वृद्ध अन् बालगोपाळांना होणारा नाहक त्रास. गेल्या वर्षी दुपारी साडेतीन ते चार या वेळेत अक्षता पडल्याने अनेक भक्तगणांनी हिरेहब्बू मंडळींकडे नाराजी व्यक्त केली होती. भक्तगणांच्या या भावनेचा विचार करून यंदा यात्रेतील सर्वच विधी वेळेत पार पाडण्यासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानकरी, नंदीध्वजधारी, मास्तर यांच्यासह मान्यवरांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेताना भक्तगणांनी एकमुखाने हा निर्णय स्वीकारत यंदाचा यात्रा सोहळा देखणा करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.  

विशेष म्हणजे या बैठकीत ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या ‘शोभेच्या दारूकामाऐवजी लेसर शो’ या बातमीचाही उल्लेख केला गेला. यात्रेतील मानकºयांसह भक्तगणांच्या भावना, रुढी-परंपरेला धक्का लागणार नाही, याचा विचार करूनच हा ऐतिहासिक निर्णय घेत असल्याचे सांगत राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, यात्रेतील वाढती गर्दी, प्रत्येकाच्या घरासमोर नंदीध्वज आडवे करून होणारी पूजा, मिरवणूक मार्गांवर बांधण्यात येणाºया बाशिंगमुळे दरवर्षी नंदीध्वजांची मिरवणूक लांबतच चालली आहे. विशेषत: अक्षता सोहळ्यास सकाळपासून उपस्थित असलेल्या महिला, वृद्ध आणि बालगोपाळांचे होणारे हाल विचारात घेऊन लांबत चाललेली यात्रा वेळेत पार पाडण्यासाठी एकप्रकारची आचारसंहिताच त्यांनी भक्तगणांना घालून दिली. 

प्रारंभी देवस्थान पंच कमिटीचे माजी सदस्य नंदकुमार मुस्तारे यांनी प्रास्ताविकेत ३० वर्षांपूर्वीच्या यात्रेतील पुन्हा वैभव आणायचे  असेल तर हिरेहब्बू मंडळींना कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानकरी, भक्तगणांच्या भावनेला तडा न जाता हिरेहब्बू मंडळींनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा असेल, असा शब्द मुस्तारे यांनी तमाम भक्तगणांच्या वतीने दिला.

 पूर्वी यात्रा अगदी वेळेत व्हायची. तीच परंपरा पुन्हा यात्रेत आणण्याची शपथ घेऊ या, मुस्तारे यांच्या आवाहनास टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी प्रतिसादही दिला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवानंद हिरेहब्बू, मानकरी सुदेश देशमुख, पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, संजय दर्गोपाटील, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, माजी नगरसेवक राजशेखर चडचणकर, सोमनाथ मेंगाणे, सोमनाथ मेंडके, जनता बँकेचे संचालक महेश अंदेली, तम्मा मसरे, बाळासाहेब मुस्तारे, बिपीन धुम्मा, मल्लिनाथ खुने, अजित शेडजाळे यांच्यासह शंभरहून अधिक भक्तगण उपस्थित होते. 

१५ मानकºयांचा एकच हार; कुंभार समाजाचा निर्णय- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभारकन्येचा झालेल्या विवाहामुळे यात्रेत कुंभार समाजाला विशेष मान आहे. समाजातील १५ जणांना अक्षता आणि होम प्रदीपन (कुंभारकन्येचे सती जाणे) या दोन सोहळ्यात मान दिला जातो. गेल्यावर्षापर्यंत कुंभारवाड्यासमोर प्रत्येक मानकºयांची स्वतंत्र  पूजा व्हायची. यंदा १५ मानकºयांच्या वतीने नंदीध्वजास एकच खोबºयाचा हार घालून पूजा करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी नगरसेवक तथा मानकरी भीमाशंकर  म्हेत्रे यांनी जाहीर केले. 

कुंभार समाजाने घेतलेला निर्णय स्तुत्य असून, इतर मानकरी आणि भक्तगणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. वेळेत यात्रा पार पाडण्यासाठी हिरेहब्बू मंडळींनी घेतलेल्या निर्णयाचे पंच कमिटीच्या वतीने मी स्वागत करतो.-बाळासाहेब भोगडे, सदस्य, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी

अक्षता सोहळ्यावेळी संमती कट्ट्यावर बाराबंदीच्या पोषाखात नंदीध्वज पेलणारे उभे       राहिलेले असतात. त्यामुळे संमती वाचन करतानाचा प्रसंग भक्तगणांना दिसत नाही. नंदीध्वजधाºयांना तेथे उभे राहू न देण्याची व्यवस्था करावी.-अजित शेडजाळेभक्तगण

हिरेहब्बू मंडळींनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. होम प्रदीपन सोहळ्याच्या दिवशी नागफणा बांधलेला नंदीध्वज सायंकाळी ६ वाजताच पसारे यांच्या घरासमोरुन प्रस्थान झाला पाहिजे. तरच पुढे पहिला नंदीध्वज होम मैदानापर्यंत पेलण्यासाठी निसर्गाचीही साथ मिळेल.-रेवणसिद्ध बनशेट्टी, मानकरी

यात्रेत रात्री १२ पर्यंत वाद्यांसह मिरवणूक काढण्यास एक दिवसाची परवानगी आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लक्ष घालून यंदा दोन दिवस परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. -धनेश हिरेहब्बूभक्तगण

गेल्या काही वर्षांपासून नंदीध्वज मिरवणूक लांबत चालली आहे. लाखो भाविकांचा विचार करा. मानकरी, भक्तगणांनी आपल्या भावनांवर थोडा आळा घातला तर यंदाही ही यात्रा वेळेत पार पडेल.- नंदकुमार मुस्तारेमाजी सदस्य- पंच कमिटी

मानकरी, नंदीध्वजधारकांना आवाहन

  • -   बाराबंदी घालून पान, तंबाखू, मावा, गुटखा खाऊ नका.
  • -  नंदीध्वजास बाशिंग बांधू नये. मानकरी ते नंदीध्वज स्पर्श करुन भाविकांना देतील.
  • -    नंदीध्वज एका ठिकाणी असताना बाराबंदी पोषाखात असलेले नंदीध्वजधारी इतरत्र वावरु नये.
  • -    चारही सोहळे आटोपल्यावर रात्री लवकरात लवकर नंदीध्वज आणण्याचा प्रयत्न करावा. 
  • -    मानकरी, भक्तगण ५१, १०१ खोबºयांचे हार आणले तरी केवळ २१ खोबºयांचेच हार स्वीकारण्यात येतील.
  • -     स्पर्श करणारे बाशिंग विकू नका. 
टॅग्स :Solapurसोलापूर