शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शहरात विभाजित कुटुंबं वाढल्यानं नंदीध्वजाची पूजा यंदा लवकरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:22 IST

हर्र बोला हर्र : डिसेंबरमध्ये सुरू होणारा विधी नोव्हेंबर अखेरलाच सुरू

ठळक मुद्देग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाच्या पूजनाला शुक्रवारपासून घरोघरी सुरुवातप्रत्येक सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास १५० ठिकाणी पूजन होते़शहरात सरावाचे १८ नंदीध्वज असून, तीन हजार ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते़ 

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाच्या पूजनाला शुक्रवारपासून घरोघरी सुरुवात झाली आहे़ यंदा आठ-दहा दिवस अगोदरच या पूजेला सुरुवात झाली असून, एकाच कुटुंबातील सदस्यसंख्या वाढणार असल्याने विभाजन झाले आहे़ यामुळे प्रत्येक भक्ताला आपल्या घरी नंदीध्वज पूजन करण्याची ओढ असते़ प्रत्येक सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास १५० ठिकाणी पूजन होते़ शहरात सरावाचे १८ नंदीध्वज असून, तीन हजार ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते़ 

कुंभारी रस्त्यावर माळीनगर येथे नागनाथ म्हेत्रे कुटुंबीयाकडून यंदाचे पहिले नंदीध्वज पूजन क रण्यात आले़ . सिद्धरामेश्वरांची भक्तीगीते वाजवण्यासोबत आरती करण्यात आली़ यात्रेतील तिसºया मानाच्या सराव नंदीध्वजाचे या वेळी पूजन करण्यात आले़ या वेळी मास्तर संजीव म्हेत्रे, मल्लिनाथ म्हेत्रे, वसंत म्हेत्रे यांच्यासह चंद्रशेखर म्हेत्रे, नागनाथ हक्के आदी उपस्थित होते़ 

१९७८ पासून म्हेत्रे यांच्या घरी नंदीध्वज पूजन करण्यात येते़ माळी समाजाचा नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू होतो़ पूर्वी गावठाण भागात असलेला हा समाज शहर विस्तारानंतर माळीनगर येथे राहावयास आला़ त्यासोबत गुरुसिद्ध म्हेत्रे, नागनाथ म्हेत्रे, आप्पाशा म्हेत्रे, चिदानंद म्हेत्रे, पांडुरंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नंदीध्वज सराव या परिसरात सुरु करण्यात आला़ युवा पिढीतील श्रीकांत म्हेत्रे, केदारनाथ म्हेत्रे, योगीनाथ म्हेत्रे, श्रीधर माळी, सतीश माळी, म्हाळू जोडमोटे, मल्लिकार्जुन माळी, राजू कोळी, गोटू कदम, अमित म्हेत्रे हे अभियंता व शिक्षक असलेले भक्त सरावात सहभागी असतात़ 

सराव आणि पूजन- नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू होतो़ दररोज दुपारी १२ ते ४ व रात्री ८ ते १२ या वेळेत सराव केला जातो़ कुंभारी रस्त्यावरील आकाशवाणी ते गोदुताई विडी घरकूल परिसरात हा सराव केला जातो़ त्यासोबतच शहरातील अशोक चौक, सत्तर फूट रोड, इंदिरा नगर, एकता नगर, भद्रावती पेठ, सोरेगाव, शेळगी, तुळजापूर रोड, जुळे सोलापूर परिसरातील नंदीध्वज पूजनासाठी नेले जाते़ ५ जानेवारीपर्यंत या नित्य पूजा सुरु असतात़ 

टॅग्स :Solapurसोलापूर