शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Solapur: शॉर्ट सर्कीट होऊन सॉ मिल पेटली, बार्शीत १२ लाखांचे फर्निचर भस्मसात

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 3, 2023 22:56 IST

Solapur: बार्शी- तुळजापूर रस्त्यावर शॉर्ट सर्कीट होऊन लाकडी फर्निचर तयार करणा-या एका सॉ मिलला आग लागली. या आगीत लाकडी फर्निचर मशिनरी व इतर साहित्य जळून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- काशिनाथ वाघमारे सोलापूर -  बार्शी- तुळजापूर रस्त्यावर शॉर्ट सर्कीट होऊन लाकडी फर्निचर तयार करणा-या एका सॉ मिलला आग लागली. या आगीत लाकडी फर्निचर मशिनरी व इतर साहित्य जळून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बार्शी येथे तुळजापूर रोडवर कदमवस्ती जवळ घडली. याबाबत तालुका पोलिसात सम्राट प्रतापसिंह ठाकूर (रा.बार्शी) यांनी तालुका पोलीसात शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली आणि त्याची नोंद झाली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी सम्राट ठाकूर आणि त्याचा भाऊ अमृत हे दोघे फर्निचर व लाकडाचा व्यवसाय करतात. त्यांच्या सॉ मिल जवळूनच महावितरणचे ४४० व्होल्टेजची थ्री फेज जुने कनेक्शन गेलेले आहे. रात्री अचानक वादळी वारे झाले आणि प्रवाहीत वायर तुटली. मिलच्या बाहेर असलेल्या लाकडी स्क्रॅपवर पडली. यावेळी लाकडाने व भुस्याने पेट घेतला. पाहता-पाहता आग भडकत गेली. मिलमधील साहित्य पेटत गेले. या आगीने रौद्ररुप धारण केले आणि लहान १४ मशिनरी जळून खाक झाल्या. तसेच तर तयार केलेल्या ५० चौकटी व २५ खिडक्या व मोठया दोन मशिनरी आणि कापून ठेवलेली लाकडं तसेच मशीनरी जळाल्याने जवळपास १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Solapurसोलापूर