शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Sancharbandi; धान्य संपलेच असेल तर घरपोच मिळणार सेवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:01 IST

अन्नधान्य वितरण विभाग सतर्क; रेशन दुकाने बंद, गॅस सिलिंडर घरपोच मिळणार

ठळक मुद्देकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी संचारबंदीची घोषणा केली नागरिक रस्त्यावर येऊ नयेत व त्यांच्यापासून संसर्ग वाढू नये असा हेतू अन्नधान्याची वाहतूक सुरू राहणार असून, यामुळे टंचाई भासणार नाही

सोलापूर : संचारबंदीच्या काळात सोलापूर शहरासह पाच तालुक्यातील ३० गावातील रास्त भाव धान्य दुकाने (रेशन दुकान) पूर्णपणे बंद राहणार आहे; मात्र स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची घरपोच सेवा सुरू राहील आणि घरातील धान्यच जर संपले असेल तर अशा गरजू लोकांना घरपोच धान्य दिले जाणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी  दिली.

 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पाच तालुक्यातील ३० गावात व सोलापुरात संचारबंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रास्त भाव धान्य दुकानातून अन्नसुरक्षा कायद्यातून ८० टक्के आणि ग्रामीण भागात सुमारे ७० टक्के अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कोणालाही अन्नधान्याची टंचाई भासणार नाही. संचारबंदी काळात दहा दिवस शहरातील सर्व ३४१ दुकाने बंद राहणार आहेत; मात्र अद्याप ज्या रेशन कार्डधारकांनी जुलै महिन्याचे धान्य नेले नाही. त्यांचे अन्नधान्य परत जाणार नाही. त्या ग्राहकांनी २७ जुलैनंतर अन्नधान्य रेशन दुकानातून घेऊन जावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

असे पुरविण्याचे नियोजनसंचारबंदीच्या दहा दिवसांच्या कालावधीत अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत असलेल्या गरीब, कामगार व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच धान्य पुरविण्याचे नियोजन केले आहे. अशा लोकांनी परिमंडळ ‘अ’ चे अधिकारी नंदकुमार धनगर, ‘ब’ चे नितीन वाघ,‘क’ चे अनिल गवळी आणि ‘ड’ च्या जयश्री मांडवे यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. केशरी कार्डधारकांनाही जूनचे धान्य दिले जाणार आहे. हे धान्य शासनाकडून अद्याप उपलब्ध झालेले नाही. पण हे धान्य येत्या काही दिवसात येणार असून, २७ जुलैनंतर या धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकारी पाटील यांनी सांगितले. 

धान्याची नाही टंचाईकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. या काळात नागरिक रस्त्यावर येऊ नयेत व त्यांच्यापासून संसर्ग वाढू नये असा हेतू आहे. त्यामुळे रेशन दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत; मात्र अन्नधान्याची वाहतूक सुरू राहणार असून, यामुळे टंचाई भासणार नाही असे पुरवठा अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या