शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात सोलापूरच्या पोलिसांनी ठामपणे सांगितले, सुरक्षेसाठी शहरात हेल्मेटसक्ती आवश्यकच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:04 IST

सोलापूर : शहरातील वाहनांच्या संख्येत वाढत होत आहे़ सातत्याने अपघात होत असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती आवश्यकच आहे, असे ...

ठळक मुद्देशंभूराजे युवक संघटनेतर्फे याचिका२८ डिसेंबर रोजी न्यायालयात होणार सुनावणीन्यायालयाने आठ दिवसांची मुदत न देता दोन दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले

सोलापूर : शहरातील वाहनांच्या संख्येत वाढत होत आहे़ सातत्याने अपघात होत असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती आवश्यकच आहे, असे म्हणणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी न्यायालयात मांडण्यात आले. हेल्मेट सक्तीबाबत जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर २८ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. 

जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून जिल्ह्यात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) च्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हेल्मेट सक्तीच्या आदेशाला मनाई हुकूम द्यावा यासाठी शंभूराजे युवक संघटनेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर २६ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. बुधवारी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे या न्यायालयात हजर झाल्या होत्या. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने म्हणणे सादर केले. जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश हे योग्यच आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट असणे आवश्यक आहे, असे म्हणणे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी मांडले. 

हेल्मेट सक्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी म्हणणे मांडण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचेही म्हणणे जाणून घेतले जाणार आहे. तिन्ही प्रशासनाचे म्हणणे मांडून झाल्यानंतर हेल्मेट सक्तीवर न्यायालय निर्णय देणार आहे. 

दोन दिवसांत म्हणणे मांडा...- हेल्मेट सक्तीबाबत १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली़ दुसºया दिवसापासून सक्ती करण्याचे आदेश दिले. एका रात्रीतून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शंभूराजे युवा संघटनेच्या वतीने अ‍ॅड. संतोष होसमनी यांच्यामार्फत सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आर.डी. खेडेकर यांच्या न्यायालयात प्रातिनिधीक स्वरूपाचा दावा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वतीने अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत व महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. एस. आर. पाटील यांनी म्हणणे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली होती. न्यायालयाने आठ दिवसांची मुदत न देता दोन दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. म्हणणे न मांडल्यास पुढील आदेश दिला जाईल, अशी अट घालून प्रशासनाचा अर्ज मंजूर केला आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक नितीन चव्हाण यांनी दिली आहे. 

- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हेल्मेट सक्तीचा आदेश दिल्यानंतर शहर व जिल्ह्यात वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारवाई तीव्र होत असताना, याचिका दाखल झाल्यामुळे वाहनचालकांना सध्या थोडा दिलासा मिळाला आहे. बहुतांश वाहनचालकांनी हेल्मेट खरेदीचा निर्णय पुढे ढकलला आहे. २८ डिसेंबर रोजी न्यायालयात काय सुनावणी होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसRto officeआरटीओ ऑफीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय