शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पंढरपूरला मिळणार आणखी एक विशेष गाडी; सांगली, सातारामार्गे एक्सप्रेस मुंबईला जाणार

By appasaheb.patil | Updated: June 7, 2023 20:48 IST

Solapur: पंढरपूरच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात पंढरपूरला आणखी एक विशेष गाडी मिळणार असून सांगली, सातारामार्गे ही नवी गाडी मुंबईला पोहोचणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप रेल्वेने प्रसिध्द केली नाही.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : पंढरपूरच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात पंढरपूरला आणखी एक विशेष गाडी मिळणार असून सांगली, सातारामार्गे ही नवी गाडी मुंबईला पोहोचणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप रेल्वेने प्रसिध्द केली नाही.

पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. शिवाय आषाढी यात्रेत तर लाखो भाविकांची गर्दी असते. दररोज शेकडो भाविक पंढरपूरला एसटी व खासगी बसने येतात. शिवाय रेल्वेने येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. सध्या पंढरपूर शहरात रेल्वे स्थानक आहे. याठिकाणाहून अनेक रेल्वे गाड्या धावतात. सध्या मुंबई-पंढरपूर ही एक गाडी कुर्डूवाडी मार्गे दररोज धावते. त्याला प्रतिसादही मोठया प्रमाणात आहे. मात्र आता दुसरी मुंबई-पंढरपूर गाडी आता सातारा सांगली मार्गे सुरु होणार असल्याचे संकेत प्रवासी संघटनेने दिले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरIndian Railwayभारतीय रेल्वे