शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या सुरक्षित प्रवास संकल्पनेला बसतोय फटका, परिवहनला हवी आयुक्तांची कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:55 IST

एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे.

ठळक मुद्देअशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकटमागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहेचेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले

राजकुमार सारोळे सोलापूर दि २९ : एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे. परिवहनच्या सुधारणेला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची कृपादृष्टी हवी, अशी प्रतिक्रिया कामगारांतून व्यक्त होत आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मनपाचा पदभार घेतल्यापासून आरोग्य, शिक्षण व मनपा प्रशासन याबाबतीत चांगले निर्णय घेतले. प्रारंभी अशोक लेलँडच्या प्रश्नावरून त्यांनी परिवहनच्या कारभारात चांगले लक्ष घातले होते. पण परिवहनमधील कर्मचाºयांच्या गोंधळामुळे ते कामावर नाराज झाले. त्यात डिझेल खरेदी प्रकरणावरून परिवहन सभापती दैदीप्य वडापूरकर यांनी काढलेल्या पत्रकावरून त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. परिवहनचा वाढणारा तोटा व सतत मनपाकडून करावी लागणारी आर्थिक मदत यावरून आयुक्तांचे खटके उडाले. परिवहनने स्वत:च्या पायावर उभे रहावे, याबाबत त्यांनी सतत सूचना केल्या. पण अशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकट झाली. मागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहे. कामगारांचे वेतन थकले. वेतनासाठी आंदोलन व कामगार न्यायालयात गेल्याने परिवहनबद्दल नकारात्मकता आणखीन वाढली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिल्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मनपाने तयारी केली आहे. काँग्रेस राजवटीच्या काळातही परिवहनची अशीच दैनावस्था झाली होती. पण त्यावेळच्या सत्ताधाºयांनी मनपाकडून व शासनाकडून मदत आणून परिवहनला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डळमळीत असणारा परिवहनचा गाडा चालत राहिला. आता मनपा, राज्य आणि देशात भाजपाची सत्ता आहे. परिवहन सभापती भाजपाचा असताना व त्यांची खाते सुधारण्याची तळमळ असताना जाणूनबुजून परिवहनला टाळे ठोकण्यावर भर दिल्याचे दिसून                 येत आहे. -------------------------गड्डा यात्रेचे नियोजन कोलमडले...- परिवहनचे महत्त्वाचे निर्णय मनपाच्या सभेत अडकले आहेत. सभा तहकूब झाल्याने, वेळेवर निर्णय न झाल्याने भाड्याने बस घेता आल्या नाहीत. त्यामुळे गड्डा यात्रेत उत्पन्न वाढविण्याचे नियोजन कागदावरच राहिले. गड्डा यात्रेसाठी ५५ बसचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात दुरुस्तीनंतर ४७ गाड्या उपलब्ध झाल्या. पण वाढलेल्या गाड्यांना चालक मिळाले नाहीत. स्मार्ट रस्ता खोदाईमुळे रंगभवनला थांबा केल्याने यात्रेतील मुख्य दोन दिवसांचे प्रवासी तीन आसनी रिक्षांनी पळविले. ही बाब लक्षात आल्यावर वाहतूक पोलिसांच्या मदतीने दारूकामादिवशी ह. दे. प्रशालेचा थांबा मिळवून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न नेता आले. अशात सभागृहाने परिवहनचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. पण आयुक्तांची नकारात्मकता कायम असल्याने सुधारणेला संधी दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर मनपातील गटबाजीला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आता याचा फायदा परिवहनला होईल, अशी आशा आहे. ------------------दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ....- चेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. कामगारांच्या वृत्तीवर बोट ठेवून परिवहन चालविण्यात अर्थ नाही, असा सूर काढत दोन्ही मंत्र्यांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केला. शहरातील नागरिकांना सुरक्षित प्रवाससेवा उपलब्ध करून देणे हे मनपाच्या कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशपातळीवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर गंभीरपणे चर्चा होत असताना स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया सोलापूरने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. -----------------मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीबाबत केलेल्या सूतोवाचमुळे मी परिवहनसाठी दोन्ही मंत्र्यांकडे जाऊन बसणार आहे. विशेष निधीतून परिवहनला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल.-दैदीप्य वडापूरकर, सभापती, परिवहन समिती

टॅग्स :Solapurसोलापूर