आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदाच्या वादावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पडदा टाकला़ आगामी एक वर्षासाठी सोलापूर महानगरपलिका सभागृहनेते पदी संजय कोळी यांची नियुक्ती करावी असे आदेश दिले़ शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी यांनी दुपारी बाराच्या सुमारास महापौर शोभा बनशेट्टी व इतर पदाधिकाºयांच्या उपस्थित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून आलेले पत्र कोळी यांना दिले़संजय कोळी हा गट स्थायी सभापती म्हणून निवृत्त होत आहेत़ लागलीच त्यांच्यावर सभागृहनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे़ सभागृहनेते सुरेश पाटील गेल्या तीन महिन्यांपासून आजारी आहेत़ मुंबई येथील बॉम्बे हॉस्पीटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ प्रभारी सभागृहनेता कोण यावरून महापालिकेच्या तीन सभामध्ये गोंधळ झाला होता़ बुधवार १ मार्च रोजी स्थायी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता़ या पदासाठी राजश्री कणके यांचे नाव पुढे आल्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाचे सहा सदस्य नाराज होऊन महापालिकेत आलेच नव्हते़ त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी प्रदेश भाजप कार्यालयाने दखल घेत सभागृहनेते, स्थायी सभापतीच्या निवडीच्या नावावर शिक््कामार्तेब केले आहे़ यामुळे भविष्यात वाद मिटतील असे चिन्हे दिसत आहेत़ याबाबत संजय कोळी यांची सभागृहनेतेपदाची अधिकृत घोषणा महापालिकेच्या सभागृहात होणार आहे़
संजय कोळी सोलापूर महानगरपालिकेचे नवे सभागृहनेते, भाजप प्रदेश कार्यालयाने घातले लक्ष, सभागृहनेतेपदाच्या वादावर पडला पडदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:10 PM
सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदाच्या वादावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पडदा टाकला़ आगामी एक वर्षासाठी सोलापूर महानगरपलिका सभागृहनेते पदी संजय कोळी यांची नियुक्ती करावी असे आदेश दिले़
ठळक मुद्देशहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी यांनी दुपारी बाराच्या सुमारास महापौर शोभा बनशेट्टी व इतर पदाधिकाºयांच्या उपस्थित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून आलेले पत्र कोळी यांना दिले़संजय कोळी हा गट स्थायी सभापती म्हणून निवृत्त होत आहेत़ लागलीच त्यांच्यावर सभागृहनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे़