शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

सोलापूर महापालिकेच्या कराची ३२0 कोटी थकबाकी

By admin | Updated: October 13, 2016 22:09 IST

कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामांना महापालिकेला पैसे कमी पडत आहेत तर दुसरीकडे मिळकत कराची तब्बल ३२0 कोटी थकबाकी असल्याचे आढळले आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 13 -  कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामांना महापालिकेला पैसे कमी पडत आहेत तर दुसरीकडे मिळकत कराची तब्बल ३२0 कोटी थकबाकी असल्याचे आढळले आहे. आयुक्त विजयकुमार काळम यांनी गुरूवारी मिळकत कर वसुलीचा आढावा घेतला. यापूर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी वसुली क्लार्क व पेठनिहाय असलेल्या थकबाकीची आकडेवारी मागितली होती. गेल्या तीनन दिवसांत सुटीच्या काळात अशा याद्या तयार करण्यात आल्या. २३ विभागांची पेठनिहाय यादी आयुक्तांकडे सादर करण्यात आली. यात शहर, हद्दवाढ व गलिच्छ वस्ती विभागाकडे कराची ३२0 कोटी थकबाकी असल्याचे आढळले. यात २0५ कोटी मागील तर ११४ कोटी चालू थकबाकी आहे. सप्टेंबरअखेर ६५ कोटी ७४ लाख १३ हजार ५३१ इतकी तर ७ आॅक्टोबरअखेर १ कोटी ३४ लाख अशी ६७ कोटी कर वसुली झाली आहे. एकूण थकबाकीच्या केवळ २१.४0 टक्के इतकी वसुली आहे. वसुली कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत आयुक्तांनी नापसंती व्यक्त केली. वसुली क्लार्कनी मोकळ्या प्लॉटचे मालक आढळत नसल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त काळम यांनी प्लॉटच्या मूळ मालकांना थकबाकीच्या नोटिसा काढा, त्यावरही संबंधितांनी दखल न घेतल्यास महसूल कायद्यान्वये संबंधित जागेवर महापालिकेचे नाव लावण्याची कारवाई सुरू करा. प्लॉटधारकांचे नोटरी व्यवहार व इतर तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाहीत. रेल्वेची ११ तर अन्य एका संस्थेची ९ कोटी थकबाकी असल्याचे दिसून आले. कोट्यधीश थकबाकीदारांची यादी द्या. त्यासंबंधी मी स्वत: निर्णय घेईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. वसुली आणणाऱ्या क्लार्कनिहाय आयुक्तांनी आढावा घेतला. त्यात शेख, पांढरे, नरोटे, व्ही. व्ही. कुलकर्णी यांची वसुली कमी असल्याचे आढळल्यावर कामात सुधारणा करण्यासाठी त्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा, असे आदेश आयुक्त काळम यांनी यावेळी दिले. २0 टक्के वसुलीचे उद्दिष्टआठ दिवसांत वसुली विभागाला २0 टक्के वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हद्दवाढ विभागात ११९ कोटींचे उद्दिष्ट आहे, त्यात वसुली फक्त २५ कोटी झाली आहे. उद्दिष्टाच्या केवळ १७.३३ टक्के काम झाले आहे. शहर विभागात १९0 कोटींचे उद्दिष्ट आहे, वसुली फक्त ४१ कोटी झाली आहे. गलिच्छ वस्ती विभागाचे ९ कोटी ९२ लाख उद्दिष्ट आहे तर वसुली फक्त १ कोटी ३३ लाख झाली आहे. या सर्व विभागांनी नवीन उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. दिवाळी तोंडावर आहे. बोनस, उचल व पगारासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा हवा असल्याने वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.