शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिष्यवृत्तीची फी मनपा भरणार, माध्यमिक शाळांचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:13 IST

मनपा शाळांची गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची फी मनपा भरणार असल्याची माहिती उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्दे शाळांची गुणवत्ता वाढीसाठी इच्छुकांचे आॅनलाईन अर्ज भरावेत : ढेंगळे-पाटील विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी सराव परीक्षा घेतल्या जात आहेतप्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ पूर्वीपासूनच दिला जात आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : मनपा शाळांची गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची फी मनपा भरणार असल्याची माहिती उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. गतवर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षा पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती, पण गतवर्षीपासून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. मनपा शिक्षण मंडळातर्फे प्राथमिक शाळांचा कारभार पाहिला जातो. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ पूर्वीपासूनच दिला जात आहे. गतवर्षी ९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. चालूवर्षी ७० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन फॉर्म भरला आहे. या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी सराव परीक्षा घेतल्या जात आहेत. प्राथमिक शिक्षण मंडळाकडे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येतात. आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग प्रशासनाकडून पाहिले जातात. मनपाच्या माध्यमिक सहा शाळा आहेत. यापूर्वी या शाळांमधून शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थी बसविले जात नव्हते. यंदापासून हा प्रयोग राबविण्यासाठी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांचे शुल्क मनपा भरेल. त्यादृष्टीने या परीक्षेला पात्र ठरणाºया आठवीच्या मुलांचा आॅनलाईन अर्ज शिक्षकांनी भरावा, असे सूचित केले आहे. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची वानवा आहे. भरती बंद असल्याने पर्यायी शिक्षक नियुक्त करून कामकाज पाहिले जात आहे. अशाही स्थितीत शाळांची गुणवत्ता वाढीसाठी इच्छुकांचे आॅनलाईन अर्ज भरावेत, अशा सूचना केल्याचे ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका