शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 11:58 IST

महापौरांची घोषणा : स्थापना दिनानिमित्त गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार 

ठळक मुद्देकर्मचाºयांचा महागाई भत्ता १२५ वरून १३२ पर्यंत वाढसोलापूर शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध - महापौर बनशेट्टी

सोलापूर: महानगरपालिकेतर्फे १ मे महाराष्ट्र दिन व महापालिकेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते इंद्रभुवनसमोर ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेता संजय कोळी, परिवहन समिती सभापती तुकाराम मस्के, गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक विनोद भोसले, श्रीनिवास करली, नगरसेविका संगीता जाधव, ज्योती बमगोंडे, वौष्णवी करगुळे, कामिनी आडम, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, सहायक आयुक्त अभिजित हराळे, प्रशासन अधिकारी सुधा साळुंके, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, विजय राठोड, संजय धनशेट्टी, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, करसंकलन अधिकारी आर. पी. गायकवाड, सफाई अधीक्षक संजय जोगदनकर, अग्निशामक दलप्रमुख केदार आवटे, आयुक्तांचे स्वीय सहायक राहुल कुलकर्णी, क्षीरसागर उपस्थित होते. 

 याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर बनशेट्टी यांनी १ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे कामगारांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात कामगारांचे रक्त सांडले, त्याची आठवण म्हणून आज जागतिक स्तरावर १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

सोलापूर शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ‘नगरसेवा हीच ईश सेवा’ या महापालिकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे अधिकारी व कर्मचाºयांनी नागरिकांना सोयी देण्यासाठी काम करावे, असे आवाहन करतानाच कर्मचाºयांचा महागाई भत्ता १२५ वरून १३२ पर्यंत वाढ देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी केले. 

११ गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ११ गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. विठ्ठल सोडल (आरोग्य विभाग), अवेक्षक अण्णाराव बिराजदार (पाणीपुरवठा), आरोग्य निरीक्षक अब्दुल्ला खान, लिपिक सविता केंभावी (लेखापाल कार्यालय), नागेश वेदपाठक (आरोग्य कार्यालय), गोपाल बेरे (गवसु वसुली), राजू मंजरतकर (कामगार कल्याण), मजूर मोहन मडिवाळ (उद्यान), श्रीनिवास मिसालोलू (नगर अभियंता), चालक चंद्रकांत देवरे (अग्निशामक दल), यल्लप्पा मग्रुमखाने (झोन क्र. ८) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाMaharashtra Dayमहाराष्ट्र दिन