शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांना रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न, श्रीशैल गायकवाडसह २० जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 12:27 IST

घंटागाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाºया वाहन-चालक, बिगारी सेवकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत येऊन मनपा आयुक्तांच्या निजी कक्षाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आणि स्वत: व आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीशैल चंद्राम गायकवाड (वय ४८) सह जवळपास ३० जणांविरोधात सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्देमनपा आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केला़ बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीशैल चंद्राम गायकवाड (वय ४८) सह जवळपास ३० जणांविरोधात सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला हा प्रकार महापालिका आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयासमोर घडला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : घंटागाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाºया वाहन-चालक, बिगारी सेवकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत येऊन मनपा आयुक्तांच्या निजी कक्षाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आणि स्वत: व आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीशैल चंद्राम गायकवाड (वय ४८) सह जवळपास ३० जणांविरोधात सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मंगळवारी, २ जानेवारी रोजी सकाळी १० ते १०़५० च्या सुमारास हा प्रकार महापालिका आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयासमोर घडला़ अपर आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्रिंबक पाटील हे मनपा आयुक्तांसमवेत बोलत होते़ घंटागाड्यांवरील कंत्राटी कामगारांचा प्रश्न घेऊन श्रीशैल गायकवाड याने कार्यकर्त्यांना घेऊन आला़ हातामध्ये रॉकेलची कॅन, बाटली, लाठीकाठी घेऊन कार्यकर्त्यांसमवेत आला़ बाहेर जोरजोरात घोषणाबाजी करत आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला़ यावेळी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर थांबलेले कर्मचारी त्रिंबक ताटे, अमित काळे, पोलीस कर्मचारी हरिकृष्ण चोरमले, हवालदार महेश शेजेराव, पोलीस नाईक  प्रशांत गाडे यांनी त्याला आत घुसण्यास विरोध केला़ बाटलीतील रॉकेल स्वत:च्या आणि इतरांवर ओतून आत शिरला़ तसेच मनपा आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केला़ यावेळी सदर बझारचे पोलीस धाऊन येत त्याच्याजवळील रॉकेल कॅन आणि काडेपेटी काढून घेतली़ अधिक तपास फौजदार पाटील करीत आहेत़ -------------------------पोलिसांमुळेच वाचलो- घंटागाडी कर्मचाºयांची समजूत काढूनसुद्धा आडमुठी भूमिका घेत त्यांनी कामबंद आंदोलन केले. सोमवारी सफाई अधीक्षकास दमबाजी केली. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्त मागविला होता. कचरा संकलनासाठी वाहने मार्गस्थ करून मी कार्यालयात येऊन बसलो. अशातच काही कर्मचारी संतप्त होऊन माझ्या कार्यालयाच्या दिशेने येत आहेत, अशी खबर पोलिसांना लागली. साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी तातडीने माझ्या कार्यालयाचा ताबा घेतला व आतून तिन्ही दारे बंद केली. बाहेर काय घडले हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. ---------------------पर्यायी व्यवस्था सुरू...- या प्रकारानंतर आयुक्त डॉ. ढाकणे हे गंभीर झाले आहेत. घंटागाडी कर्मचाºयांना सहानुभूती दाखवून वेतन वाढवून दिले तरी अशा पद्धतीने गुंडगिरी करून प्रशासन व नागरिकांना वेठीस धरले. विनाकारण दहशत निर्माण केली. त्यामुळे प्रशासनाने आता इतर कर्मचाºयांच्या मदतीने कचरा उचलण्याची तयारी केली आहे. यापुढे महापालिकेत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. शहर स्वच्छतेसाठी प्रशासन तयार असून, गरज पडली तरी लोकसहभाग घेऊ, अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका