शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या इमारती आता स्वच्छ राहणार; व्यावसायिक संस्थेला साफसफाईचे काम देणार

By appasaheb.patil | Updated: February 27, 2023 12:52 IST

टेंडर प्रक्रिया लवकरच; हुतात्मा, इंद्रभुवन, काउंन्सिल हॉल व प्रशासकीय इमारतीचा समावेश

सोलापूर - महापालिका आवारातील इंद्रभुवन, काउंन्सिल हॉल, प्रशासकीय इमारत तसेच हुतात्मा स्मृती मंदिर, डफरीन चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह या ५ इमारतीच्या साफसफाईचा मक्ता देण्यात येणार आहे. साफसफाईची कामे करणाऱ्या व्यावसायिक संस्थेला ३ वर्षांसाठी हा मक्ता देण्यात येईल. यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी दिली.

महापालिका आवारातील अनेक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याने महापालिका आवारातील प्रशासकीय इमारत व इतर कार्यालयांमध्येही अस्वच्छता पसरली आहे. शिवाय हुतात्मा स्मृती मंदिरातील अस्वच्छतेबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. यामुळे महापालिकेच्या या इमारती स्वच्छ सुंदर व नेटक्या दिसाव्यात या उद्देशातून आयुक्तांनी साफसफाईचा मक्ता व्यावसायिक कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी घेतला आहे. लवकरच याबाबतची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकांना दंड करणार...

महापालिका इमारत व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी अथवा कार्यालयात थुंकल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय अस्वच्छ परिसर करणार्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.