शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मान्सुन अपडेट : लांबलेल्या पावसाने वाढवली चिंता

By appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 17:59 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : जिल्ह्यातील ९२ मंडलांपैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, त्यापैकीच १४ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षाही अतिशय कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खरिपाचे क्षेत्र असलेल्या उत्तर-दक्षिण, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांतच कमी पावसाची नोंद झाली असली तरी गेला दीड महिना पाऊस लांबल्याने संपूर्ण ...

ठळक मुद्देपाऊस लांबल्याने संपूर्ण पिके धोक्यात प्रत्यक्षात एकूण १८६६.२६ मि.मी. तर सरासरी १६९.६६ मि.मी. इतका पाऊस९२ पैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : जिल्ह्यातील ९२ मंडलांपैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, त्यापैकीच १४ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षाही अतिशय कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खरिपाचे क्षेत्र असलेल्या उत्तर-दक्षिण, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांतच कमी पावसाची नोंद झाली असली तरी गेला दीड महिना पाऊस लांबल्याने संपूर्ण पिके धोक्यात आली आहेत.सोलापूर जिल्ह्यात रोहिणी व मृग या नक्षत्रांत शक्यतो पाऊस पडत नाही. काही भागात दमदार पाऊस पडल्याने ओढे, नालेही वाहिले होते. यामुळे यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकºयांनी धाडसाने शेतात ऊस लागवड करण्यास सुरुवात केली. याशिवाय बागायती पिकेही घेण्यास सुरुवात केली. गडबड करून खरीप पेरणीही उरकली. मात्र खरीप पेरणीनंतर पाऊस गायबच झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात चार जून ते १६ जून या कालावधीत चांगला पाऊस पडला. त्यानंतर पाऊस पडला नसल्याने संपूर्ण खरीप पिके वाया जाऊ लागली आहेत़ त्यातच पिकांवर यंदा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे.रोहिणी व मृग या नक्षत्रांमध्ये पडलेला पाऊसही जिल्ह्यातील ९२ पैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे. तर त्यापैकीच १४ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. बोरामणी मंडलात ६३ मि.मी., अक्कलकोट तालुक्यातील जेऊर मंडलात ३० मि.मी., तडवळ मंडलात ८७ मि.मी., करजगी मंडलात ५८ मि.मी., मोहोळ तालुक्यातील वाघोली मंडलात ९५ मि.मी., कामती (बु.) मंडलात ४८ मि.मी., करमाळ्यातील कोर्टी मंडलात ३८ मि.मी., पंढरपूरच्या भाळवणी मंडलात ९३ मि.मी., सांगोल्यातील जवळा मंडलात ३२ मि.मी., माळशिरसच्या लवंग मंडलात ४२ मि.मी., पिलीव मंडलात ८६ मि.मी., मंगळवेढा तालुक्यातील मरवडे मंडलात ७४ मि.मी., हुलजंती मंडलात ५३ मि.मी. व भोसे मंडलात ४९ मि.मी. पाऊस पडला आहे.उत्तर तालुक्यातील सर्वच पाचही मंडलांत, दक्षिणमधील वळसंग, मुस्ती, मंद्रुप, होटगी, विंचूर, निंबर्गी, बार्शी तालुक्यातील आगळगाव, पांगरी, सुर्डी, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, किणी, मोहोळ तालुक्यातील शेटफळ, सावळेश्वर, नरखेड, पेनूर, टाकळी सिकंदर, माढ्यातील रांझणी, म्हैसगाव, करमाळ्यातील केत्तूर, उमरड, अर्जुननगर, पंढरपूर तालुक्यातील सर्वच नऊ मंडलांत कमी पाऊस झाला आहे. सांगोल्यातील कोळा, महुद बु., शिवणे, माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर, नातेपुते, दहिवली, मंगळवेढ्यातील आंधळगाव, मारापूर या मंडलांत कमी पावसाची नोंद झाली.--------------३१ जुलैपर्यंत अपेक्षित पाऊसउत्तर सोलापूर-२३९.६० मि.मी., दक्षिण सोलापूर- २३९.६० मि.मी., बार्शी-२३६.९० मि.मी., अक्कलकोट- २५४.६० मि.मी., मोहोळ-२०३.१० मि.मी., माढा-१८३.३० मि.मी., करमाळा-२०३.९० मि.मी., पंढरपूर-१८४.४० मि.मी., सांगोला-१६०.५० मि.मी., माळशिरस-१५१.४० मि.मी., मंगळवेढा-१७६.६० मि.मी. एकूण २२३३.९० मि.मी. तर सरासरी २०३.०८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एकूण १८६६.२६ मि.मी. तर सरासरी १६९.६६ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.