शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सोलापूर, माढा लोकसभेसाठी दोन प्रमुख अधिकाºयांसह तीस हजार कर्मचारी निवडणुकीमध्ये गुंतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:41 IST

सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन निवडणूक निर्णय अधिकारी, बारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ...

ठळक मुद्देसोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात एकूण ३ हजार ५६३ मतदान केंदे्रसोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात

सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन निवडणूक निर्णय अधिकारी, बारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर तीस हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या मतदारसंघात येणाºया सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भूसंपादन उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. प्रांताधिकारी शिवाजी जगताप हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. पुनर्वसन खात्याच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. प्रांताधिकारी ज्योती पाटील या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले हे पंढरपूरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघाकरिता अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या मतदारसंघातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी किशोर माळी यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माढा विधानसभा मतदारसंघाकरिता प्रांताधिकारी ज्योती कदम यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघाकरिता प्रांताधिकारी शमा पवार यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघासाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माण विधानसभा मतदारसंघाकरिता प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन्ही मतदारसंघाकरिता ३ हजार ५६३ मतदान केंद्रे- सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात एकूण ३ हजार ५६३ मतदान केंदे्र असणार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार मतदान केंद्राची संख्या अशी आहे - करमाळा :३३४, माढा : ३४३, बार्शी : ३२६, मोहोळ : ३३१, सोलापूर शहर उत्तर : २७९, सोलापूर शहर मध्य : ३0३, अक्कलकोट : ३५९, दक्षिण सोलापूर : ३२३, पंढरपूर : ३३१, सांगोला : २९६,माळशिरस :३३८

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय