शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण

By appasaheb.patil | Updated: May 5, 2023 14:44 IST

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. संबंधित गावांमध्ये शिवार फेरी तात्काळ पूर्ण करून निवडलेल्या सर्व गावांचा गाव आराखडा आठवडाभरात सर्वोच्च प्राधान्याने तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.

जलयुक्त शिवार २ साठी गावे निवडून एक महिना पूर्ण झाला आहे. परिणामी गाव आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. यासाठी जलसंधारण व कृषि विभागाकडून विविध पातळीवर काम सुरू आहे.  येत्या आठवडाभरात, संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन, सर्व संबंधित यंत्रणामध्ये समन्वय साधून, आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.  पुढील आठवड्यात जलयुक्त शिवार अभियानाविषयी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत तालुकास्तरीय समित्यांनी, गाव आराखडा पूर्ण करून, जिल्हा समितीकडे मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे कृषी अधीक्षक यांनी सांगितले. प्रारंभी डी. वाय. दामा यांनी शिवार फेरी व गाव आराखडा कामांचा तालुकानिहाय प्रगती आढावा सादर केला.

टॅग्स :SolapurसोलापूरJalyukt Shivarजलयुक्त शिवार