शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

देशातील पहिल्या अटल टिंकरींग लॅबचे सोलापूरात उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:07 IST

संशोधनवृत्ती वाढवा, कलामांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांचे आवाहन

ठळक मुद्देनीती आयोगाने दिलेल्या भारतातील पहिल्या अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटनआधुनिकतेचे शिक्षण मिळाले पाहिजे: सोनवणे 

सोलापूर : शिक्षणाबरोबर संशोधनवृत्तीची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे़ त्यांच्यातील संशोधन वृत्तीला शाळेने वाव दिला पाहिजे़ ही संशोधनवृत्ती वाढली पाहिजे़ ही नवी पिढी डॉ़ कलामांचे स्वप्न पूर्ण करेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केली़ 

नीती आयोगाने दिलेल्या भारतातील पहिल्या अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटन बेगम कमरुनिस्सा कारीगर गर्ल्स हायस्कूलमध्ये डॉ़ भारुड यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी बोलत असताना त्यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली़ याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे, आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य जमिल दफेदार, जमियत ए उलमा हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहीम जहूरकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, जितेंद्र पवार, उर्दू मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अ़जब्बार शेख, प्राचार्या सबीना इंगळगी, एटीएलचे समन्वयक ज़ जी़ दखणी, उपप्राचार्या पी़ ए़ सातखेडे, पर्यवेक्षिका मख्तारुन्निसा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

प्रारंभी कुराण पठणाचे श्लोक सादर करुन प्रार्थना केली गेली़ प्रास्ताविकेतून प्राचार्या सबीना इंगळगी यांनी नीती आयोगाकडून भारतात प्रथमच अटल टिंकरींग लॅब या शाळेला मिळाल्याचे सांगून याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे म्हणाले़ यावेळी जितेंद्र पवार यांनी अटल टिंकरींग लॅब मिळवून आणण्यात प्राचार्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत त्या जिद्दी आणि चिकाटी असल्याचे त्यांनी सांगितले़ 

आधुनिकतेचे शिक्षण मिळाले पाहिजे: सोनवणे - यावेळी शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे बोलताना आज शेतकºयाचा मुलगा शेती करायला नको म्हणतोय, पारंपरिक शेतीप्रक्रिया त्याच्या शिक्षणाला शोभत नसल्याची खंत व्यक्त करीत शेतकºयांची मुले आधुनिक शेतीचे शिक्षण घेऊन शेती करणे अपेक्षित असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद