शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: विनापरवानगी झेडपीत आल्यास एक दिवसाची पगार कापणार, सीईओंचे निर्देश

By appasaheb.patil | Updated: August 30, 2023 17:21 IST

Solapur News: जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत येणारे तालुकास्तर कार्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांची परवानगी बंधनकारक केले आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत येणारे तालुकास्तर कार्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांची परवानगी बंधनकारक केले आहे. विनापरवानगी जिल्हा परिषद मुख्यालयास आल्यास संबंधित कर्मचार्याची एक दिवसाची विनावेतन व एक दिवसाची रजा करण्याची कार्यवाही विभाग प्रमुखांनी करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी बुधवारी काढले.

दरम्यान, पंचायत समिती, पंचायत समिती स्तरावरील उपविभाग, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायतीमधील काही कर्मचारी हे जिल्हा परिषद मुख्यालयास कामानिमित्त भेट देत असतात परंतू काही कर्मचारी हे कामाशिवाय अनावश्यक व अकारण जिल्हा परिषद मुख्यालयास वारंवार भेट देत असल्याची बाब सीईंओ मनिषा आव्हाळे यांच्या निर्दशनास आली होती. त्यानंतर सीइेंओ आव्हाळे यांनी जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांची रितसर लेखी परवानगी घेऊनच जिल्हा परिषद मुख्यालयास भेट द्यावी असे निर्देश दिले आहे. विनापरवानगी जिल्हा परिषदेत आल्यास एक दिवसाचा पगार अथवा रजा करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभाग प्रमुखांनी करावी असेही निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर