शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव, आमदार प्रणिती शिंदेंसह ७० लोकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 12:21 IST

शासनाने १ जानेवारीपासून शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. डीपीडीसीच्या बैठकीला निघालेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : शासनाने १ जानेवारीपासून शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. डीपीडीसीच्या बैठकीला निघालेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. सरकारी रुग्णालयातील ही दरवाढ गरिबांना परवडणारी नाही. केसपेपरपासून शस्त्रक्रिया, एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी तपासणीच्या शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. आरोग्य सेवा स्वस्त करा, गरिबांना न परवडणारी शुल्कवाढ मागे घ्या, अशा घोषणा असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात घेऊन निदर्शने केली. कुठे आहेत पालकमंत्री, कुठे आहेत आरोग्य मंत्री अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी देऊन लक्ष वेधले. याच दरम्यान डीपीडीसीच्या बैठकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून घेराव घातला. त्यावेळी आमदार शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील शुल्कवाढ रद्द करण्याचे पालकमंत्री देशमुख यांना निवेदन दिले.  पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले. या दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना लाठीमार करून गाडीपासून दूर केले. यावेळी माजी आमदार यलगुलवार यांच्याशीही पोलिसांची झटापट झाल्याने वातावरण तापले होते. आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते.-------------- आरोग्य सेवा स्वस्त करण्याच्या मागणीला धरुन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करणाºया आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वालेसह ६० ते ७० जणांवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ आरोग्य सेवा स्वस्त करा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी काँग्रेसने पालकमंत्री विरोधात आंदोलन केले़ पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालत घोषणाबाजी केली़ याप्रकरणी आ़ प्रणिती शिंदे, प्रकाश वाले, प्रकाश यलगुलवार, नगरसेवक चेतन नरोटे आणि बाबा करगुळेसह जवळपास ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ या घटनेत जखमी झालेले पोलीस नाईक देशमुख यांनी फिर्याद दिली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदे