शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: मणिपूर मधील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटचे सोलापुरात आंदोलन

By राकेश कदम | Updated: July 24, 2023 15:37 IST

Solapur: मणिपूर राज्यातील दंगलीमध्ये महिलांवर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. 

- राकेश कदम - मणिपूर राज्यातील दंगलीमध्ये महिलांवर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. 

मणिपूर राज्यातील दंगलींना केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सोलापुरात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव म्हणाले, मे महिन्यापासून मणिपूर राज्यात दंगली उसळल्या आहेत. भाजप सरकारने या दंगली नियंत्रणात आणल्या असत्या तर महिलांवरील अत्याचाराचा प्रकार घडला नसता. या घटनेमुळे आम्ही सर्वजण देशातील लोकशाही टिकेल की नाही या चिंतेत आहोत. सरकारने या प्रकरणातून धडा घ्यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

 माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहर सपाटे, शंकर पाटील, नाना काळे, महिला शहराध्यक्ष सुनिता तोटे, ग्रामीण महिला अध्यक्ष सुवर्णा शिवपुजे, नलिनी चंदिले, प्रतीक्षा चव्हाण, संगीता जोगदनकर, पुनम बनसोडे, फारुक मटके, चंद्रकांत पवार, अजित पात्रे, संजय कुराडे, संपन्न दिवाकर, गफूर शेख, सर्फराज शेख, बाळासाहेब मोरे, अजित बनसोडे, रेखा सपाटे, लता फुटाणे उपस्थित होते..

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSolapurसोलापूर