शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी यंत्रणा विस्कळीत, जिल्हास्तरावरून नियोजन होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:17 IST

मोबाईल क्रमांक, शिष्यवृत्ती, अंगणवाडीतील सुविधा, विविध प्रकारच्या शासकीय योजना अशा एक नव्हे शेकडो कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे मेसेज आपल्या मोबाईलवर येत आहेत. तर दुसरीकडे आधार कार्ड काढून देणारी महा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळीत झाली आहे

ठळक मुद्देमहा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळीत महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागून गेलेजिल्हा प्रशासनामार्फत एकूण १३४ महा-ई-सेवा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध

राकेश कदमआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : मोबाईल क्रमांक, शिष्यवृत्ती, अंगणवाडीतील सुविधा, विविध प्रकारच्या शासकीय योजना अशा एक नव्हे शेकडो कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे मेसेज आपल्या मोबाईलवर येत आहेत. तर दुसरीकडे आधार कार्ड काढून देणारी महा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळीत झाली आहे. महा-ई-सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापन सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले तरी महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागून गेले आहेत. आधार कार्ड काढण्याचे काम पूर्वी खासगी यंत्रणेमार्फत केले जात होते. यासाठी खासगी कंत्राटदारांना सरकार ठराविक पैसे देत होते. त्यामुळे कंत्राटदारांनी नागरिकांचे काम मोफत करणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी लूट सुरू केली. त्यामुळे शासनाने हे काम शासकीय यंत्रणेमार्फत सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटरकडे दिलेली आधार किट महाईसेवा केंद्राकडे हस्तांतरित केली. महा-ई-सेवा केंद्र चालकाने आधार कार्ड काढून देणाºया आॅपरेटरची माहिती प्रमाणपत्रासह युआयडीकडे जमा करणे बंधनकारक आहे. या आॅपरेटरची पडताळणी झाल्यानंतर शासनाकडून महा-ई-सेवा केंद्राला पासवर्ड दिला जातो. हा पासवर्ड मिळाल्यानंतर महा-ई-सेवा केंद्रामध्ये आधार कार्ड काढता येते. जवळपास सर्वच महा-ई-सेवा केंद्र चालकांनी ही माहिती भरून पडताळणी करून घेतली आहे. परंतु, त्यांना अद्याप पासवर्ड देण्यात आलेला नाही. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर या तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्राकडून मुख्य कार्यालयाकडे तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र अडचणी दूर होताना दिसून येत नाहीत.---------------------फक्त ९८ ठिकाणी काम सुरू जिल्ह्यात ११६० गावे आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत एकूण १३४ महा-ई-सेवा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी ९८ केंद्रांमध्ये आधार नोंदणीचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक ठिकाणी काम ठप्पच आहे. प्रशासनाने मंडलनिहाय आधार केंद्रे दिली आहेत. मंडल परिसरातील गावांनी एकाच ठिकाणी येऊन आधार कार्ड काढायचे आहे. दुर्गम भागातील लोकांना यात अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. तालुका स्तरावरील सेतू केंद्रामध्ये आधारची सुविधा अद्याप कार्यरत आहे़ --------------------तगादा कायम अंगणवाडी बालके, शाळा, महाविद्यालयांमध्ये आधार कार्डसाठी तगादा लावला जात आहे. आधार नोंदणीची यंत्रणाच विस्कळीत असल्यामुळे पालकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हेलपाटे घालावे लागत आहेत.