शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात होणार २२ लाख वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:35 IST

सोलापूर: तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यंदा सोलापूर जिल्ह्यास १६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे; मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२.२६ लाख झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्यानुसार झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.राज्य शासनाच्या वनविभागाकडून गेली दोन वर्षे वृक्ष लागवड करण्याचे ...

ठळक मुद्देगेली दोन वर्षे वृक्ष लागवड करण्याचे अभियान सुरु जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आलीजास्त झाडे लावण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला

सोलापूर: तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यंदा सोलापूर जिल्ह्यास १६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे; मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२.२६ लाख झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्यानुसार झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

राज्य शासनाच्या वनविभागाकडून गेली दोन वर्षे वृक्ष लागवड करण्याचे अभियान सुरु आहे.  पहिल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली होती.  सन २०१७ मध्ये झालेल्या अभियानात जिल्ह्यास पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते;  मात्र एकूण उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला आहे.  त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट  दिले आहे.  त्यापैकी सर्वाधिक म्हणजे दहा लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट वनविभागाला देण्यात आले आहे.  त्यापाठोपाठ सामाजिक वनीकरण विभागास पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

प्रमुख विभागनिहाय उद्दिष्ट च्वनविभाग, (दहा लाख), सामाजिक वनीकरण (५ लाख), जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी (९० हजार),महानगरपालिका (८ हजार), सार्वजनिक बांधकाम विभाग (२० हजार),अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (२० हजार) सोलापूर विद्यापीठ (५० हजार), पोलीस आयुक्तालय शहर (१ हजार), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण (३ हजार), सहायक आयुक्त, समाजकल्याण (३ हजार), जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आयुष अधिकारी, सोलापूर (४ हजार) कार्यकारी अभियंता, एमएसईबी (१ हजार), उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग (४ हजार), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (५ लाख १४ हजार ५००),राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर (५ हजार ५८०) सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, सोलापूर (७ हजार ५००)